NIAच्या तपासात मोठा खुलासा, PFIच्या टार्गेटवर होती नरेंद्र मोदींची पाटणा रॅली

मुंबई तक

24 Sep 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:09 AM)

केरळमधून अटक करण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (PFI) सदस्य शफिक पैठची राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) चौकशी केली आहे. यामध्ये मोठा खुलासा झाला आहे. शफीक पैठने एनआयएला सांगितले की, त्यांचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाटणा रॅली होती. शरीफच्या म्हणण्यानुसार, पीएफआय नेत्यांना रॅलीदरम्यान वातावरण बिघडवायचे होते. त्यासाठी बॅनर-पोस्टर्सही तयार करण्यात आले होते. PFIच्या खात्यात मिळाले […]

Mumbaitak
follow google news

केरळमधून अटक करण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा (PFI) सदस्य शफिक पैठची राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) चौकशी केली आहे. यामध्ये मोठा खुलासा झाला आहे. शफीक पैठने एनआयएला सांगितले की, त्यांचे लक्ष्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाटणा रॅली होती. शरीफच्या म्हणण्यानुसार, पीएफआय नेत्यांना रॅलीदरम्यान वातावरण बिघडवायचे होते. त्यासाठी बॅनर-पोस्टर्सही तयार करण्यात आले होते.

हे वाचलं का?

PFIच्या खात्यात मिळाले 120 कोटी

एनआयएने केलेल्या चौकशीत शफीकने सांगितले की, यावर्षी 12 जुलै रोजी पटना येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची रॅली होती. ही रॅली पीएफआयच्या निशाण्यावर होती. तपासादरम्यान एका वर्षात पीएफआयच्या खात्यात सुमारे 120 कोटी रुपये आल्याचे आढळून आले आहे. यासोबतच जेवढी रक्काम खात्यात जमा झाली होती त्याच्या दुप्पट रक्कम रोख स्वरूपात जमा करण्यात आली होती. ही कोट्यवधी रुपयांची रक्कम केवळ भारतातील विविध शहरांतूनच नाही तर परदेशातूनही जमा झाल्याचे एनआयएच्या तपासात निष्पन्न झाले आहे. हा पैसा देशविरोधी कारवायांसाठी वापरला जात होता.

NIA ची मोठी कारवाई! टेरर फंडिंग प्रकरणी महाराष्ट्रात 16 ठिकाणी तर 11 राज्यात छापेमारी

PFIनं आपला अजेंडा पुढे नेण्यासाठी संस्था स्थापन केल्या

एनआयएच्या कारवाईदरम्यान देशातील अनेक भागातून 106 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले बहुतांश केरळमधील होते. एनआयएने केरळमधून 22 जणांना अटक केली आहे. पीएफआयने आपला अजेंडा पुढे नेण्यासाठी आधीच अनेक संस्था स्थापन केल्या आहेत. ज्याद्वारे पीएफआयने देशात आपला अजेंडा सुरू ठेवण्यासाठी संपूर्ण योजना तयार केली होती.

मात्र, यंत्रणांना याची माहिती मिळताच त्यांनी त्याचा भांडाफोड केला आहे. माहितीनुसार, पीएफआयने एक-दोन नव्हे तर अर्धा डझनहून अधिक अशा संस्था तयार केल्या आहेत. अंतर्गत सुरक्षा कार्यालयाच्या उच्च-स्तरीय कागदपत्रांनुसार, या संघटना सरकारी एजन्सीच्या निर्बंधांपासून दूर राहण्यासाठी आणि दहशतवादी अजेंडा पसरवण्यासाठी तयार केल्या गेल्या असल्याचं समोर आलं आहे.

अटकेविरोधात संप पुकारण्यात आला

NIA च्या छाप्यात PFI च्या कार्यकर्त्यांना अटक केल्यामुळे शुक्रवारी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत केरळमध्ये संप पुकारला होता. पीएफआय नेतृत्वाने सांगितले की, राज्यातील त्यांच्या नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ संपाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्रात देखील 16 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते, त्यातून 20 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

    follow whatsapp