ADVERTISEMENT
वसईतील सुरूची बीच येथील समुद्रकिनारी मंगळवारी एक भला मोठा व्हेल मासा मृत अवस्थेत आढळून आला आहे.
साधारण 30 फूट लांब तर 12 फूट व्यास असलेल्या हा व्हेल मासा मृतावस्थेत आढळून आला आहे.
या व्हेल माशाचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला की इतर कोणत्या कारणास्तव याचा वसई पोलीस आता शोध घेत आहेत.
याबाबत मृत व्हेल माशाचे शवविच्छेदन करण्यासाठी वन विभागाला कळविण्यात आल्याची माहिती वसई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी दिली आहे.
बुधवारी सकाळी व्हेल माशाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याला समुद्रकिनारी वाळूत पुरण्यात आले.
दरम्यान, या व्हेल माशाची माहिती मिळताच समुद्र किनारी असणाऱ्या गावातील नागरिकांनी मासा पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.
प्रचंड मोठ्या आकाराचा हा व्हेल समुद्रकिनारी नेमका कसा आला असावा याबाबत देखील आता शोध घेतला जात आहे.
ADVERTISEMENT