नियम मोडला मोटारसायकल चालकाने, दंड बसला कार चालकाला, वाशिममधला अजब प्रकार

मुंबई तक

• 08:59 AM • 01 Dec 2021

लॉकडाउन काळात विनाकारण घराबाहेर बाईकवर फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांनी थेट कारवाई केली होती. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर वाहतूक पोलीस ई-चलानच्या माध्यमातून कारवाई करत असतात. परंतू वाशिममध्ये काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्यात बाईकवरुन ट्रिपल सिट जात असलेल्या मोटारसायकलविरुद्ध पोलिसांनी चलान केलं पण ते चलान पोहचलं एका चारचाकी मालकाला. चारचाकी मालकालाही हे चलान हाती पडल्यानंतर मोठा […]

Mumbaitak
follow google news

लॉकडाउन काळात विनाकारण घराबाहेर बाईकवर फिरणाऱ्या लोकांवर पोलिसांनी थेट कारवाई केली होती. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर वाहतूक पोलीस ई-चलानच्या माध्यमातून कारवाई करत असतात. परंतू वाशिममध्ये काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

हे वाचलं का?

ज्यात बाईकवरुन ट्रिपल सिट जात असलेल्या मोटारसायकलविरुद्ध पोलिसांनी चलान केलं पण ते चलान पोहचलं एका चारचाकी मालकाला. चारचाकी मालकालाही हे चलान हाती पडल्यानंतर मोठा धक्का बसला. यानंतर चौकशी केली असतान मोटारसायकल चालकाने आपल्या गाडीवर खोटी नंबरप्लेट लावल्याचं समोर आलं आहे.

शिरपूर पोलिसांनी 8 जुलै 2020 रोजी एका ट्रिपल सीट मोटारसायकल क्रमांक MH 37 Z 302 या मोटारसायकल मालकाला ई चलान पाठवलं. मात्र दंड वेळेत न भरल्यामुळे कारवाईची नोटीस पाठवण्यात आली अभिजीत गिद या चारचाकी मालकाला. २०० रुपये दंड भरा अथवा लोकअदालतीमध्ये हजर रहा अशा आशयाची नोटीस आल्यानंतर गिद चक्रावून गेले.

यानंतर त्यांनी हा प्रकार शिरपूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या कानावर घातला. यानंतर तपासणी केली असता MH 37 Z 302 या नंबरने कोणतीही दुचाकी नंबर प्लेट रजिस्टर झालेली नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे सदर दुचाकीचालक हा डुप्लिकेट नंबर प्लेट लावून फिरत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे पोलिसांसमोर आता या दुचाकीचालकाला शोधण्याचं मोठं आवाहन आहे. याचसोबत ती दुचाकी ही चोरीची होती का याचाही तपास करणं गरजेचं असल्याचं शिरपूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

बुलढाणा : काकाकडून अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार

    follow whatsapp