युट्यूब, इन्स्टाग्रामवर कोट्यवधी फॉलोअर्स असलेली औरंगाबादमधील प्रसिद्ध युट्यूबर बिंदास काव्या बेपत्ता झाली आहे. ९ सप्टेंबर रोजी दुपारी बिंदास काव्या घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती अद्याप परतलेली नाही. तिच्या आईवडिलांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, सोशल मीडियावरून तिला परत येण्याचं आवाहन केलं आहे.
ADVERTISEMENT
औरंगाबादमध्ये सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली बिंदास काव्या बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली आहे. बिंदास काव्या बेपत्ता झाल्याची माहिती तिच्या आईवडिलांनी दिली. बिंदास काव्या शुक्रवारी दुपारी घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती परत आलीच नाही.
बिंदास काव्या उशिरापर्यंत परत न आल्यानं आईवडिलांनी तिचा शोध घेतला. तिच्या मित्रांच्या घरी आणि आजूबाजूला चौकशी केल्यानंतरही ती सापडली नाही. त्यानंतर बिंदास काव्याच्या आईवडिलांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
बिंदास काव्याने रागाच्या भरात सोडलं घर?
मिळालेल्या माहितीनुसार बिंदास काव्या बेपत्ता झाल्यानंतर वेगवेगळी चर्चा केली जात आहे. दरम्यान, बिंदास काव्याने रागाच्या भरात घर सोडल्याची माहिती समोर आली आहे. वाद झाल्यानंतर तिने घर सोडलं आणि तेव्हापासून ती बेपत्ता असल्याची माहिती मिळतेय.
बिंदास काव्याचा औरंगाबाद पोलिसांकडून शोध सुरू
बिंदास काव्या बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आईवडिलांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला. त्यातून त्यांनी बिंदास काव्या बेपत्ता झाल्याची माहिती दिली. त्याचबरोबर तिला घरी परत येण्यासाठी साद घातली आहे. बिंदास काव्या बेपत्ता झाल्यानं तिचे आईवडील चिंतेत असून, सध्या औरंगाबाद पोलिसांकडून बिंदास काव्याचा शोध घेतला जात आहे. बिंदास काव्याचे युट्यूब चॅनेल असून, त्याचे ४ मिलियनपेक्षा अधिक सबस्क्राईबर्स आहेत.
बिंदास काव्याचं खरं नाव काय आहे?
प्रसिद्ध युट्यूबर बिंदास काव्याचं वय १६ वर्ष असून, ती घरातून निघून गेली आहे. बिंदास काव्याचं खरं नाव काव्या यादव असं आहे. तिच्या सोशल हॅण्डल्सवरती बिंदास काव्या नाव आहे. त्यामुळे ती या नावानेच प्रसिद्ध आहे. बिंदास काव्या औरंगाबादमधील पडेगाव भागात राहते. राहत्या घरातूनच ती निघून गेली.
बिंदास काव्याबद्दल (काव्या यादव) माहिती असल्यास वा कळल्यास औरंगाबादमधील छावणी पोलीस ठाण्यात संपर्क करावा, असं आवाहन बिंदास काव्याच्या आईवडिलांनी तिच्या सोशल हॅण्डलवरून केलं आहे.
ADVERTISEMENT