शेतकऱ्यांची वीज तोडल्याप्रकरणी भाजपचं विधानसभेच्या बाहेर आंदोलन

मुंबई तक

• 07:12 AM • 02 Mar 2021

शेतकऱ्यांची वीज तोडल्याप्रकरणी भाजपने आक्रमक होत आज विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. वीज बिलाचे कनेक्शन कापणे बंद करा नाही तर खुर्च्या रिकाम्या करा. शेती पंपाचे कनेक्शन तोडणे बंद करा. असे फलक भाजपच्या आंदोलकांनी हाती घेतले होते. एवढंच नाही तर पूजाला न्याय मिळालाच पाहिजे अशाही घोषणाही देण्यात आल्या. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. यादिवशीही ठाकरे सरकारविरोधात […]

Mumbaitak
follow google news

शेतकऱ्यांची वीज तोडल्याप्रकरणी भाजपने आक्रमक होत आज विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. वीज बिलाचे कनेक्शन कापणे बंद करा नाही तर खुर्च्या रिकाम्या करा. शेती पंपाचे कनेक्शन तोडणे बंद करा. असे फलक भाजपच्या आंदोलकांनी हाती घेतले होते. एवढंच नाही तर पूजाला न्याय मिळालाच पाहिजे अशाही घोषणाही देण्यात आल्या. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. यादिवशीही ठाकरे सरकारविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. आमदार राम सातपुते यांनी या आंदोलनाची सुरूवात केली.

हे वाचलं का?

या सरकारला शेतकऱ्यांशी काहीही घेणंदेणं नाही. हे सरकार जनतेच्या पैशांची लूट करून आपली तिजोरी भरतं आहे. शेतकऱ्यांचं वीज कापण्याचं पाप या सरकारने केलं आहे. या सरकारने सावकारकीचा व्यवसाय मांडला आहे. वीज तोडण्या थांबवल्या नाहीत तर महाराष्ट्राची जनता यांच्या सरकारचं कनेक्शन बंद करेल असाही इशारा सातपुते यांनी दिला. आत्तापर्यंत आम्ही दोन आंदोलनं केली मात्र तरीही निर्लज्ज सरकारला जाग आलेली नाही. खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोड शेडिंग होतं आहे. हे आंदोलन आज विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून करतो आहे येत्या काळात रस्त्यावर येऊन आंदोलन करू असंही राम सातपुते यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाले राम सातपुते?

विधानसभेच्या गेटवर भाजप आमदार राम सातपुते यांनी आंदोलन केलं. शेतकऱ्यांनी वीज बिलमाफी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. सरकारकडून वीज कनेक्शन कट केली जात आहेत. सरकारने वीज बिलाच्या मुद्द्यावर सावकारकी सुरू केली आहे. हे सरकार नीट वागलं नाही तर सरकारच्या डोक्यात कृषी पंप घालण्यात येईल असाही इशाराही राम सातपुते यांनी दिला.

    follow whatsapp