पुणे : देवेंद्र फडणवीस हे पुण्याचे पालकमंत्री होणार, देवेंद्र फडणवीस 2024 ची लोकसभा पुण्यातून लढविणार अशा चर्चा मागील काही काळांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु होत्या. मात्र मी पुण्याचा पालक मंत्री होणार नाही. पुण्याची लोकसभाही लढविणार नाही. अशा स्पष्ट शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ते पुण्यात इलेक्ट्रीक इ-मोबिलीटीच्या बसेसच्या उद्घाटनानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
ADVERTISEMENT
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस यांनी आज बोलताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यावेळी पुण्याचे पालकमंत्री म्हणून तुम्ही येणार आहात का? 2024 ची लोकसभा पुण्यातून लढविणार आहात का? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. यावर फडणवीस म्हणाले की, मी पुण्याला पालकमंत्री म्हणून येणार नाही, मी लोकसभा लढवावी अशी तुमची का इच्छा आहे, मी तुम्हाला महाराष्ट्रात नको आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
पुणे महापालिकेचे विभाजन : चंद्रकांतदादांची मागणी; फडणवीसांचा पूर्णविराम…
त्यामुळे फडणवीस यांच्या नकारानंतर आता पुण्याचे पालकमंत्रीपद पुन्हा एकदा मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री आणि पुण्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडेच येण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये गिरीश बापट पुण्याचे खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर काही दिवसांसाठी पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे आले होते. त्यानंतर आता पुण्यात 21 आमदारांपैकी भाजपचे 9 आमदार आहेत. तर काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आमदार आहेत. शिवाय या 10 आमदारांमध्ये चंद्रकांत पाटील हे सध्या एकटेच मंत्री आहेत.
दसऱ्याला एकनाथ शिंदेंचा ‘दुसरा’ मेळावा?, सदा सरवणकरांचा शिवाजी पार्कसाठी अर्ज
पुण्यात ध्वजारोहण करण्याचा मान चंद्रकांत पाटील यांच्याकडे…
15 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात शासकीय ध्वजारोहण करण्याचा मान संबंधिक जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना असतो. मात्र यावेळी पालकमंत्र्यांची नाव घोषित झाली नसल्याने पुण्यात ध्वजारोहण करण्याचा मान चंद्रकांत पाटील यांना देण्यात आला होता. मात्र पुण्यात परंपरेप्रमाणे राज्याचे राज्यपाल ध्वजारोहण करत असल्याने अखेरच्या टप्प्यात चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरच्या ध्वजारोहणाचा मान दिला होता.
ADVERTISEMENT