मुंबई: ‘राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला मुंबईतून दर महिन्याला 100 कोटी रुपये खंडणी जमा करून देण्याचे आदेश दिले होते याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी.’ अशी मागणी करत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात समता नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
ADVERTISEMENT
‘गृहमंत्री देशमुख यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करावा’
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रात दिली आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून अशाप्रकारे राज्याच्या गृहमंत्र्यांवर विरोधातच असा दावा करणे हे अतिशय गंभीर प्रकरण असून, याबाबत राज्याचे गृहमंत्री देशमुख यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करावा व परमवीर सिंग यांनी आपल्या पत्रात नमूद केलेल्या प्रत्येक व्यक्तीची सखोल चौकशी करावी. अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
‘परमबीर सिंग यांच्या आरोपात तथ्य असण्याची दाट शक्यता’
‘मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी पुराव्यांसह इतके गंभीर आरोप करून दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधी उठून गेला असताना सुद्धा राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारची चौकशी सुरू करण्यात आलेली नाही. इतकेच नव्हे तर परमवीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्राचा दुसऱ्या दिवशी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून करण्यात आलेल्या खुलासा पत्रात सुद्धा परमवीर सिंग यांच्या कोणत्याही आरोपांचे खंडन करण्यात आलेले नाही. त्यामुळे परमबीर सिंग यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपामध्ये तथ्य असण्याची दाट शक्यता आहे.’ असंही भातखळकर म्हणाले.
भाजपच्या ‘त्या’ आरोपांचं अनिल देशमुखांनी दिलं उत्तर, म्हणाले…
‘…तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊ’
‘तसेच, या प्रकरणात नाव असलेल्या अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक पालांडे, पोलीस उपायुक्त भुजबळ, सहाय्यक पोलीस आयुक्त पाटील यांची चौकशी केल्यास आणखी सत्य समोर येतील. तसेच यातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणी अनिल देशमुखांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे. जर या संदर्भात राज्य सरकारकडून 24 तासांत गुन्हा दाखल न झाल्यास आपण उच्च न्यायालयात जाऊ.’ असा इशारा आमदार भातखळकर यांनी दिला आहे.
मोठी बातमी: …आता अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, पवारांकडून क्लीन चीट
तसेच या पत्रात समतानगर पोलीस स्थानकाच्या अंतर्गत येणाऱ्या बार, रेस्टॉरंट, पब यांच्याकडून किती खंडणी आतापर्यंत वसूल करण्यात आली आहे व ती कोणी वसुली केली, याची सुद्धा सखोल चौकशी करण्याची मागणी यावेळी आमदार भातखळकर यांनी केली आहे.
दरम्यान, आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की, भातखळकर यांनी केलेली तक्रार पोलीस नोंदवून घेतात की नाही.
ADVERTISEMENT