संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा लोटा, खातो सेनेचं जागतो पवारांना – गोपीचंद पडळकर

मुंबई तक

• 03:01 AM • 28 Jun 2021

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन आता राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा चांगलाच सामना रंगताना दिसत आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. संन्यास घेतील तुमचे दुष्मन ! शिवसेनेच्या देवेंद्र फडणवीसांना कोपरखळ्या “संजय राऊत हा बिनबुडाचा लोटा आहे. हा सेनेची खातो आणि पवारांना जागतो. अशा भाटाची धनगर […]

Mumbaitak
follow google news

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन आता राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा चांगलाच सामना रंगताना दिसत आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.

हे वाचलं का?

संन्यास घेतील तुमचे दुष्मन ! शिवसेनेच्या देवेंद्र फडणवीसांना कोपरखळ्या

“संजय राऊत हा बिनबुडाचा लोटा आहे. हा सेनेची खातो आणि पवारांना जागतो. अशा भाटाची धनगर समाजाला गरज नाही. देवेंद्र फडणवीसांनी आपल्या काळात धनगर समाजासाठी तरतूद केलेले १ हजार कोटी तुझ्या मालकाने अडवून ठेवले आहेत, त्याबद्दल आपलं तोंड कधीतरी उघड. काकांच्या सांगण्यावरुन सामना अग्रलेखात संजय राऊत अविनाश भोसले हे अजित पवारांच्या किती जवळचे आहेत हे सांगतोय आणि पुतण्याच्या बुडाखाली फटके लावायचं काम करतोय. हा असा हुजऱ्या ना जन्माला येईल ना येणार”, असं म्हणत पडळकरांनी संजय राऊंतावर निशाणा साधला आहे.

दरम्यान ओबीसी आरक्षणावरुन राज्यात चक्काजाम आंदोलन करणाऱ्या भाजपचा महाविकास आघाडीतल्या नेत्यांनीही चांगलाच समाचार घेतला आहे. “ओबीसींचा इतकाच कळवळा असेल तर प्रश्न कसा सोडवाल ते सांगा सत्तेत येण्याची गरज नाहीये. प्रश्न कसा सोडवायचा ते आम्ही पाहून घेऊ.” जयंत पाटील नांदेडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. जनतेने तुम्हाला नाकारले आहे त्यामुळे सत्तेत येण्याची गरज नाही. सत्तेत आल्याशिवाय काही करायचच नाही असं काही आहे का? ही भावना खऱ्या लोकप्रतिनिधीची आहे असं मला वाटत नाही असंही जयंत पाटील म्हणाले.

त्यामुळे या प्रकरणी दोन्ही बाजूच्या नेत्यांमधलं वाकयुद्ध कुठल्या थरापर्यंत जातं हे पाहण महत्वाचं असणार आहे.

OBC आरक्षणाचे खरे मारेकरी भाजपच, तुमची डाळ शिजणार नाही – यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल

    follow whatsapp