Narayan Rane यांच्या अटकेनंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून पहिली प्रतिक्रीया, J.P.Nadda म्हणतात…

मुंबई तक

• 12:45 PM • 24 Aug 2021

केंद्रीय लघू आणि सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून पहिली प्रतिक्रीया आलेली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी राणेंवर झालेल्या कारवाईनंतर ट्विट करत महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. नारायण राणेंवर करण्यात आलेल्या कारवाईला उत्तर देताना नड्डा म्हणाले, “महाराष्ट्र सरकारने केंद्रीय मंत्री नारायण राणेंना केलेली अटक ही घटनात्मक मुल्यांचं हनन […]

Mumbaitak
follow google news

केंद्रीय लघू आणि सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून पहिली प्रतिक्रीया आलेली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी राणेंवर झालेल्या कारवाईनंतर ट्विट करत महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.

हे वाचलं का?

नारायण राणेंवर करण्यात आलेल्या कारवाईला उत्तर देताना नड्डा म्हणाले, “महाराष्ट्र सरकारने केंद्रीय मंत्री नारायण राणेंना केलेली अटक ही घटनात्मक मुल्यांचं हनन करणारी आहे. या प्रकारच्या कारवाईमुळे आम्ही ना घाबरणार ना दबून राहणार…जन आशिर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे ही लोकं त्रस्त आहेत. आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून लढतच राहू , जन आशिर्वाद यात्रा सुरु राहिल.”

मी असतो तर कानाखाली लगावली असती असं वक्तव्य नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उद्देशून महाडमध्ये सोमवारी केलं. यानंतर आज दिवसभरात राज्यात शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून प्रत्येक ठिकाणी राणेंविरुद्ध घोषणाबाजी सुरु आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे स्थानिक नेते सुधाकर बडगुजर यांनी राणेंविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी FIR दाखल करुन घेतली. जन आशिर्वाद यात्रेदरम्यान राणे संगमेश्वरमध्ये असताना रत्नागिरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे या प्रकरणी आता पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शिवसेनेने तमाशे बंद करावेत नाहीतर BJP राज्यभर तांडव करेल – आशिष शेलार

    follow whatsapp