भाजपचा उद्धव ठाकरेंवर पलटवार : “दोन्ही विकून खाल्लीत, जरा लाज वाटू द्या”

मुंबई तक

• 03:43 AM • 27 Nov 2022

चिखली झालेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजप पक्ष आहे की चोरबाजार असं म्हणत ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांना डिवचलं. इतकंच नाही, तर देवेंद्र फडणवीसांना लाज बाळगा, असंही सुनावलं. ठाकरेंनी केलेल्या टीकेला भाजपनंही ‘जनाची आणि मनाची दोन्ही विकून खाल्लीत, जरा लाज वाटू द्या’, असं म्हणत जोरदार प्रत्युतर दिलंय. उद्धव ठाकरेंनी चिखलीतल्य […]

Mumbaitak
follow google news

चिखली झालेल्या शेतकरी संवाद मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजप पक्ष आहे की चोरबाजार असं म्हणत ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांना डिवचलं. इतकंच नाही, तर देवेंद्र फडणवीसांना लाज बाळगा, असंही सुनावलं. ठाकरेंनी केलेल्या टीकेला भाजपनंही ‘जनाची आणि मनाची दोन्ही विकून खाल्लीत, जरा लाज वाटू द्या’, असं म्हणत जोरदार प्रत्युतर दिलंय.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरेंनी चिखलीतल्य सभेत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी, अमित शाह, भावना गवळी, अब्दुल सत्तार, संजय राठोड, बच्चू कडू यांच्यासह सत्ताधारी बाकांवर असलेल्या भाजपवर हल्लाबोल केला. ठाकरेंकडून करण्यात आलेल्या टीकेला भाजपनंही ट्विट करत पलटवार केलाय.

भाजपच्या ट्विटर हॅण्डलवरून काही ट्विट्स करण्यात आलेत. ज्यातून उद्धव ठाकरेंना उलट करतानाच खिंडीत पकडण्याचा प्रयत्नही करण्यात आलाय.

‘काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही’, फडणवीसांनी लावला ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ

भाजपनं म्हटलंय की, ‘औरंगजेब आणि अफजलखानाच्या कबरीला संरक्षण देणारे आता स्वतःची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करू लागले. उद्धव ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करता करता तुम्ही स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज समजू लागलात. जनाची आणि मनाची दोन्ही विकून खाल्लीत, जरा लाज वाटू द्या’, असा पलटवार भाजपकडून ठाकरेंवर करण्यात आलाय.

भाजपचा उद्धव ठाकरेंना सल्ला

‘मिस्टर उद्धव ठाकरे, लाज तुम्हाला वाटायला हवी होती. निवडणुकीत मते मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्या नावाने मागितली. खुर्चीसाठी जनमताचा अनादर करून, भाजपचा विश्वासघात करून सत्ता स्थापन केली काँग्रेस सोबत. सत्तेसाठी लाचार होऊन काँग्रेसच्या पायावर लोळण घेणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं’, असा सल्ला भाजपनं ठाकरेंना दिला.

‘उद्धव ठाकरे, याचं जिवंत उदाहरण तुम्ही आहात’, भाजपनं काय म्हटलंय?

‘मिस्टर उद्धव ठाकरे, तुम्ही भाजपवर आरोप करण्याआधी स्वतः आत्मपरीक्षण करा. रावाचा रंक का झाला? याबद्दल अभ्यास करा. जो व्यक्ती स्वतःच्या नशिबाला स्वतःच कर्तृत्व समजून असतो, अशा व्यक्तीचा कार्यभार लवकर बुडतो. उद्धव ठाकरे, याचं जिवंत उदाहरण तुम्ही आहात’, असं म्हणत भाजपनं ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचलं आहे.

Uddhav Thackeray : ठाकरेंनीही लावला फडणवीसांचा व्हिडीओ; म्हणाले, ‘देवेंद्र जनाची नाही, तर मनाची लाज बाळगा’

‘मिस्टर उद्धव ठाकरे, 2.5 वर्षे घरात स्वतःला कोंडून घेतलं होतं तुम्ही. आज सत्ता गेल्यानंतर शेतकरी आठवला. 2 वर्षे ओला दुष्काळ होता किती रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली? कृषी वीज बिल संदर्भात तुम्ही बोलू नये. राज्यात 5 लाखांच्यावर शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कनेक्शन तुम्ही तोडली’, असा आरोपही भाजपनं केलाय.

काँग्रेस सोबत जाऊन तुम्ही कोणता तीर मारलात? भाजपचा सवाल

‘मिस्टर उद्धव ठाकरे, मेहबुबा मुफ्तींसोबत युती केली आणि काश्मीरमध्ये सार्वजनिक निवडणुका घेऊन दाखवल्या. वेळ आली युती तोडली सुद्धा. कश्मीरमध्ये आतंकवाद्यांना मदत करणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांना तुरुंगात टाकलं, अनुच्छेद 370 हटवला. तुम्ही, काँग्रेस सोबत जाऊन तुम्ही कोणता तीर मारलात?’, असं म्हणत भाजपनं उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीवरून टोला लगावला आहे.

    follow whatsapp