राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रात सत्तेवर असणाऱ्या भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका केली आहे. रांची येथे एका कार्यक्रमात बोलत असताना शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावरही टीका केली आहे.
ADVERTISEMENT
सर्वांमध्ये बंधुभाव रहावा हे केंद्र सरकारचं कर्तव्य असतं. परंतू भाजप देशात जातीय विष पसरवण्याचं काम करत आहे. दिल्लीत शेतकरी १०० दिवसांपासून आंदोलन करत आहेत. पंतप्रधानांना पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचाराला जाण्यासाठी वेळ आहे, परंतू दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करायला वेळ नाहीये.
निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालसह ५ राज्यांमध्ये निवडणुकांची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. कोलकात्याच्या ब्रिगेड मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॅली घेत ममता बॅनर्जींवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पश्चिम बंगालच्या निवडणुकीत काय घटना घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT