शालेय अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात विष पेरण्याचा भाजपचा प्रयत्न-शरद पवार

मुंबई तक

• 04:18 AM • 01 Apr 2022

शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातो आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अल्पसंख्याक विभागाचं संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर आणि मोदी सरकारवर हा गंभीर आरोप केला आहे. नेमकं काय म्हणाले आहेत शरद पवार? ”देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी […]

Mumbaitak
follow google news

शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातो आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अल्पसंख्याक विभागाचं संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर आणि मोदी सरकारवर हा गंभीर आरोप केला आहे.

हे वाचलं का?

नेमकं काय म्हणाले आहेत शरद पवार?

”देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेकांनी योगदान दिलं आहे. काश्मीर फाईल्ससारख्या सिनेमांमधून खोटा प्रोपगंडा उभा केला जातो आहे. देशात काय परिस्थिती आहे हे दिसून येतं आहे. देशात सांप्रदायिक शक्तींचा जोर वाढतो आहे. या शक्तींच्या विरोधात उभं राहण्याची आवश्यकता आहे. काश्मीर फाईल्ससारख्या सिनेमाला संमती देण्याची काहीच गरज नव्हती. ज्या लोकांच्या हातात सत्ता आहे तेच या सिनेमाचा प्रचार करत आहेत. भाजपचं सरकार देशात आलं तेव्हापासून संपूर्ण देश एकाच धर्माचा असावा असा प्रयत्न केला जातो आहे. अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात विष पेरण्याचा हेतुपुस्सर प्रयत्न केला जातो आहे.” असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

आणखी काय म्हणाले शरद पवार?

काश्मिरी पंडितांना काश्मीर खोरं सोडावं लागलं हे मान्य आहे मात्र मुस्लिमांनाही लक्ष्य केलं गेलं होतं. काश्मीर फाईल्सच्या माध्यमातून भाजप आणि धार्मिक वातावरण बिघडवत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती. देशातील सामाजिक सामंज्यस टिकवण्याचा प्रयत्न न करता हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. भाजपचे नेते लोकांना तो बघण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं आहे. काश्मिरी पंडित आणि मुस्लिमांवर झालेले हल्ले यामागे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जबाबदार होत्या असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

काश्मीर प्रश्नी सातत्याने पंडित नेहरूंना जबाबदार ठरवणं योग्य ठरणार नाही. काश्मिरी पंडित खोऱ्यातून बाहेर बाहेर पडले तेव्हा केंद्रात व्ही.पी. सिंग सरकार होते. सरकारला भाजपचा पाठिंबा होता. मुफ्ती मोहम्मद सईद हे केंद्रीय गृहमंत्री होते. जगमोहन राज्यपाल होते. याच जगमोहन यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती असाही आरोप शरद पवार यांनी केला.

मोदी सरकारला, भाजपला खरोखरच काश्मिरी पंडितांची काळजी असती तर केंद्र सरकारने पुनर्वसन केलं असतं. मात्र हे सरकार मुस्लिमांच्या विरोधात लोकांच्या भावना भडकवण्याचं काम करतं आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp