रायगड जिल्ह्यातील अलिबाग या ठिकाणी असलेल्या RCF कंपनीत आज स्फोट झाला आहे. यामध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे तर आठ कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्याच सरकारी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. बुधवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अलिबागच्या थळ येथील आरसीएफ कंपनीत हा स्फोट झाला.
ADVERTISEMENT
गॅस टर्बाईन युनिटच्या रेफ्रिजरेशन प्लांटमध्ये स्फोट
प्राथमिक माहितीनुसार आरसीएफ कंपनीच्या गॅस टर्बाईन युनिटच्या रेफ्रिजरेशन प्लांटमध्ये स्फोट झाला. या स्फोटात तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत स्फोटाची माहिती मिळतात अग्निशमन दलाने तातडीने कंपनीत धाव घेतली.
जखमींवर उपचार सुरू, तिघांची प्रकृती गंभीर
स्फोटात गंभीर जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी नवी मुंबईतल्या सरकारी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्फोटाची तीव्रता लक्षात घेऊन या ठिकाणी आठ ते दहा रूग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे.
आरसीएफ कंपनीच्या स्फोटात मृत्यू झालेल्यांची नावं
दिलशाद आलम इद्रिसी (वय २९-कुर्ला, कंत्राटी कामगार)
फैजान शेख (वय-३३, कुर्ला, कंत्राटी कामगार)
अंकित शर्मा (वय २७-आरसीएफ कर्मचारी)
जखमी झालेल्यांची माहिती
अतिंद्र, कुर्ला पश्चिम ९० टक्के भाजलेले कर्मचारी, ऐरोलीच्या रूग्णालयात दाखल
जितेंद्र शेळकरे, ऐरोलीच्या रूग्णालयात दाखल
साजिद सिद्दिक सलामती, कुर्ला पश्चिम, फोर्टिस रूग्णालयात दाखल
साजिद सिद्दीकी वय २३ ८० टक्के भाजले
जितेंद्र, ८० टक्के भाजले
ADVERTISEMENT