Bow and Arrow: ‘धनुष्यबाणाच्या वादात मी..’, पवारांनी स्पष्टच सांगून टाकलं!

मुंबई तक

• 02:56 AM • 19 Feb 2023

Sharad Pawar on bow and arrow controversy: बारामती: शिवसेनेचे (Shiv Sena) चिन्ह शिंदे गटाला (Shinde Group) मिळाल्यावरून राज्यात सध्या सुरू असलेल्या वादात मी पडणार नाही, मी त्याबाबत परवाच माझी भूमिका स्पष्ट केली आहे. असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी धनुष्यबाणाच्या (Bow and Arrow) मुद्द्यावर स्पष्टच बोलले आहेत. (after the event with amit […]

Mumbaitak
follow google news

Sharad Pawar on bow and arrow controversy: बारामती: शिवसेनेचे (Shiv Sena) चिन्ह शिंदे गटाला (Shinde Group) मिळाल्यावरून राज्यात सध्या सुरू असलेल्या वादात मी पडणार नाही, मी त्याबाबत परवाच माझी भूमिका स्पष्ट केली आहे. असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी धनुष्यबाणाच्या (Bow and Arrow) मुद्द्यावर स्पष्टच बोलले आहेत. (after the event with amit shah sharad pawar said i will not get into the bow and arrow controversy)

हे वाचलं का?

दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या दौऱ्याबाबत बोलताना पवार म्हणाले, ‘सहकार परिषदेच्या समारंभासाठी पुण्यात आले होते सहकार परिषदेचे उद्घाटन माझ्या हस्ते पार पडलं. त्यामुळे आमच्यात कोणतेही मतभेद नाही. धोरणात्मक विषयांवर आणि सविस्तर चर्चा केली. त्यांनी केलेल्या भाषणातील मुद्दे आज योग्य वाटले. बाकी राज्यात सुरू असलेल्या धनुष्यबाणाच्या वादात मी काही पडणार नाही.’ असं म्हणत शरद पवार यांनी यापुढे आपण याबाबत काहीही वक्तव्य करणार नसल्याचं म्हटलं आहे.

‘पक्ष चिन्ह गेल्याचा फारसा परिणाम होत नाही..’

दरम्यान, जेव्हा शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्यात आल्यानंतर शरद पवार यांनी यावर मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली होती.

‘केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांचा निकाल दिला आहे. त्यामुळे आता निकाल लागल्यावर त्यावर चर्चा करता येणार नाही. त्यामुळे जो निर्णय दिला आहे तो स्वीकारून पुढे जायचे असतं. पण पक्ष चिन्ह गेल्याचा फारसा परिणाम होत नसतो.’

‘मला आठवतंय की, काँग्रेसमध्ये एकदा इंदिरा गांधी आणि एका गटाचा वाद झालेला. त्यावेळी काँग्रेस पक्षाचं गाय वासरू हे चिन्ह गोठवण्यात आलं होतं. त्यानंतर काँग्रेसने पंजा हे चिन्ह घेतलं. लोकांनी त्या नव्या चिन्हाला स्वीकारलं. त्यामुळे शिवसेनेबाबतही लोकं नवं चिन्ह मान्य करतील, धनुष्यबाण गेल्याने फारसा परिणाम होणार नाही. या सगळ्याची महिनाभर चर्चा होईल. त्यानंतर सगळं थंड होईल.’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली होती.

निवडणूक आयोगाचा नेमका निकाल काय?

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारा फैसला अखेर सुनावला. निवडणूक आयोगातील कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं. निवडणूक आयोगाने शुक्रवारी सायंकाळी हा निर्णय दिला. निवडणूक आयोगाचा निर्णय हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का असून, आता ठाकरे काय भूमिका घेणार? सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावणार का? हे पाहावं लागेल.

जूनमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यांच्याबरोबर सुरुवातीला 16, तर 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात विरोधात बंड केलं. या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गटाने खरी शिवसेना आम्हीच असल्याचा दावा केला होता. मात्र, उद्धव ठाकरे यांच्याकडूनही असाच दावा करण्यात आला होता.

    follow whatsapp