आतापर्यंत लाईट गेल्यामुळे अनेकदा जाहीर कार्यक्रमांमध्ये झालेली फजिती आपण पाहिली असेल. परंतू मध्य प्रदेशात ऐन लग्नमंडपात लाईट गेल्यामुळे चक्क नवरीने आपल्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन येथे ही घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
जाणून घ्या नेमकं काय घडलं?
उज्जैनमध्ये राहणाऱ्या रमेशलाल यांच्या दोन मुली निकीता आणि करिष्मा यांचं रविवारी एकाच मंडपात लग्न होतं. डंगवारा येथील भोला आणि गणेश या दोन मुलांसोबत रमेशलाल यांच्या मुलीचं लग्न ठरलं होतं. लग्नसमारंभाला दोन्ही मुलींनी डोक्यावर पदर घेतला होता आणि दोघीही एकसारखाच ड्रेस घालून होत्या.
लाईट गेले आणि बहिणीने होणाऱ्या बहिणीच्या गळ्यात माळ घातली –
लग्नसोहळ्यातले विधी सुरु असताना अचानक लाईट गेली. यावेळी दोन्ही मुलींनी एकसारखाच ड्रेस घातला असल्यामुळे नेमकी नवरा बायकोची अदलाबदल झाली. महत्वाची गोष्ट म्हणजे कालांतराने लाईट आल्यानंतरही ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही.
लग्न लावायला आलेल्या गुरुजींनीही बदललेल्या नवरा-बायकोला सात फेरे घ्यायला लावले. जेव्हा दोन्ही मुलं आपल्या बायकोला घरी घेऊन गेले तेव्हा ही बाब यांच्या लक्षात आली. यानंतर साहजीकच वाद-विवाद रंगले. अखेरीस दोन्ही परिवारातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मध्यस्थीने दुसऱ्या दिवशी पुन्हा दोन्ही मुलींचं त्यांच्या योग्य पतीसोबत लग्न लावून देण्यात आलं.
ADVERTISEMENT