जगाची चिंता वाढवणाऱ्या ओमिक्रॉन कोरोना वेरिएंटचे आता भारतातही रुग्ण आढळले आहेत. अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे सँम्पल्स हे जिनोम सिक्वेन्सिंगला गेल्यामुळे त्याचे रिझल्ट्स येणं बाकी आहे, त्यामुळे कदाचित या रुग्णांची संख्या वाढूही शकते. ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग हा वेगाने होतोय, अशात कोरोना होऊन गेलेल्यांनाही ओमिक्रॉन या नव्या वेरिएंटमुळे पुन्हा कोरोना होऊ शकतो का? समजून घेऊयात.
ADVERTISEMENT
जागतिक आरोग्य संघटना WHO ने सांगितलंय, की प्राथमिक माहितीनुसार ओमिक्रॉनमुळे रिइन्फेक्शन म्हणजेच कोरोना होऊन गेलेल्यांना पुन्हा कोरोना होण्याचा धोका हा जास्त आहे.
दक्षिण आफ्रिका जिथे ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला, तिथे बुधवारी 4 हजार कोरोनाचे रुग्ण आढळले. तेच गुरूवारी म्हणजेच एका दिवसात 8 हजारात नवे रुग्ण आढळले. म्हणजेच एका दिवसात रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढली. त्यामुळे आफ्रीकेच्या आरोग्य खात्याने या सगळ्याचाच अभ्यास केला, आणि त्यानुसार आधी कोरोना झालेल्यांमध्ये जी इम्युनिटी तयार होते, त्यालाही ओमिक्रॉन वेरिएंट चकवा देत आहे.
Omicron Variant : 40 वर्षापुढील भारतीयांना बुस्टर डोस द्यायला हवा -जिनोम कॉन्सॉर्टियम
दक्षिण आफ्रीकेत येऊन गेलेल्या कोरोनाच्या लाटेत ज्यांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे, त्यांना आता पुन्हा कोरोना होत आहे, आणि यामध्ये खासकरून ज्यांना डेल्टा वेरिएंटमुळे कोरोना झालेला, त्यांना ओमिक्रॉन वेरिएंटमुळे कोरोना पुन्हा होत असल्याचं प्रमाण जास्त आहे, असंही साऊथ आफ्रीकेच्या Centre of Excellence in Epidemiological Modelling and Analysis या अभ्यासात सांगितलंय.
आता इम्युनिटी ही आपल्याला कोरोना झाल्यावरही मिळते, आणि कोरोना झाला नसेल पण लस घेतली असेल तरीही मिळते. मग जर कोरोना झालेल्यांमध्ये तयार झालेली इम्युनिटीही ओमिक्रॉनसमोर टिकत नाहीये, तर लसीतून मिळालेली इम्युनिटी टिकेल का?
यावर साऊथ आफ्रीकेच्या अभ्यासात अजून तरी कोणता डेटा समोर आलेला नाही. पण साऊथ आफ्रीकेची नॅशनल इन्स्टिट्युट फॉर कम्युनिकेबल डिसीजमधल्या मायक्रोबायोलॉजिस्ट अऩेवन गॉटबर्ग यांनी सांगितलंय की, याआधी ज्यांना कोरोना होऊन गेला, त्यांना डेल्टासारख्या घातक वेरिएंटमुळेही पुन्हा कोरोना झाला नाही. पण ओमिक्रॉनची केस वेगळी आहे. पण आतापर्यंतच्या केसेस पाहता त्यांचं असं मानणं आहे की ओमिक्रॉन वेरिएंटमुळे झालेलं रिइन्फेक्शन किंवा लस घेतल्यानंतर ओमिक्रॉन कोरोना वेरिएंटची लागण झाली तरी लक्षणं ही सौम्य स्वरूपाची असतात. म्हणजेच पेशंट्स फार क्रीटीकल स्टेजपर्यंत जात नाहीत.
दक्षिण आफ्रीकेतही ज्यांना कोरोना होऊन गेला आहे आणि ज्यांचं लसीकरण झालंय, अशांना ओमिक्रॉन वेरिएंटने कोविड होत असेल, तर ते पेशंट्स mild symptomatic आढळत आहेत.
ADVERTISEMENT