MLA Jayakumar Gore first Call to Ranjeetsinha Naik Nimbalkar after Accident: सातारा: साताऱ्यातील (Satara) फलटण जवळील मलठण पुलावरून थेट 30 फूट खाली कोसळून झालेल्या अपघातात भाजपचे (BJP) आमदार जयकुमार गोरे (MLA Jayakumar Gore) हे जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र जयकुमार गोरे यांच्या छातीला मार लागला आहे. पण सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांचे बंधू अंकुश गोरे व त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या सगळ्या भयंकर घटनेतही प्रसंगावधान राखून आमदार गोरे यांनी वेळीच काही महत्त्वाचे फोन करुन त्यांच्यासह सर्वांनाच मृत्यूच्या दाढेत बाहेर काढलं. भीषण अपघातानंतर नेमकं काय घडलं जाणून घेऊया सविस्तर.. (car fell down 30 feet still remained patient mla jayakumar gore made the first call to whom)
ADVERTISEMENT
पुणे येथील अपघातानंतर उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या जयकुमार गोरे यांच्या समवेत भाजपचे नेते आणि माढाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे सर्वात आधी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आमदार गोरेंना रुग्णालयात दाखल केलं
माण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांचा आज पहाटे तीनच्या सुमारास मुंबईवरून माणला परतत असताना फलटण जवळ मलठण गावाजवळील पुलावर भीषण अपघात झाला. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पुलावरील कठडा तोडून गाडी थेट 30 फूट खाली कोसळली. यामध्ये स्वतः जयकुमार गोरे हे जखमी झाले. तसेच त्यांच्याबरोबर इतर तीन जणंही जखमी झाले.
BJP आमदार जयकुमार गोरेंचा भीषण अपघात, गाडी पुलावरुन 30 फूट खाली कोसळली
या अपघातानंतर तात्काळ जय कुमार गोरे यांना पुणे येथील रुबी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तात्काळ उपचार मिळाल्यामुळे जयकुमार गोरे यांची प्रकृती स्थिर असल्याचे देखील बंधू अंकुश गोरे व त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे.
संकटातही धीर न खचणारे आमदार..
प्रचंड भीषण अपघातानंतरही आमदार जयकुमार गोरे हे घाबरले नाही किंवा डगमगले नाही. स्वत: जखमी झालेले असतानाही त्यांनी आपल्या सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांना सगळ्यात आधी धीर दिला. त्यानंतर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी प्रसंगावधान राखत
सर्वात आधी सुशांत निंबाळकर आणि नंतर खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना फोन करुन झाल्या घटनेची माहिती देत तात्काळ मदत मागितली.
पहाटे-पहाटे आलेल्या फोनने सुशांत निंबाळकर आणि रणजितसिंह निंबाळकर यांनीही घटना गंभीर असल्याचं ओळखत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी सर्व जखमींना गाडीतून बाहेर काढलं आणि रुग्णालयात दाखल केलं.
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात अर्टिगा कारचा चक्काचूर, पाच जण ठार तर तीन जखमी
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सध्या जयकुमार गोरे यांची प्रकृतीमध्ये सुधार होत आहे व त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे देखील रुबी हॉलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, वेळीच जयकुमार गोरे यांनी प्रसंगावधान राखून महत्त्वाचे फोन केल्याने त्यांच्यासह त्यांचे सहकांऱ्याचे देखील प्राण वाचले.
ADVERTISEMENT