धनंजय साबळे
ADVERTISEMENT
अमरावती: अमरावतीच्या (Amravati) अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांची खासदारकी (Member of Parliament) आता धोक्यात आली आहे. कारण नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र (Caste certificate) मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) रद्द केलं आहे. यानंतर आता नवनीत राणा यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या निकालाविरोधात आता नवनीत राणा या आता सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार आहेत.
पाहा हायकोर्टाच्या निकालानंतर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा यांनी नेमकं काय म्हटलं आहे:
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी असे म्हटले आहे की, ‘]माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा आदर आहे. पण आलेल्या निकालाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार. माननीय न्यायालयाने या निकालास 6 आठवड्यांची स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाची सुट्टी असल्यामुळे आपल्या वकिलांच्या मागणीचा न्यायालयाने विचार केला.’
‘याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिन असणाऱ्या जातपडताळणी समितीने माझे जातप्रमाणपत्र तीन वेळा पूर्ण छाननी करून वैध असल्याचा अहवाल सादर केला होता. माननीय उच्च न्यायालयाने आज जो निर्णय दिला आहे त्याचा आदर करून घटनादत्त अधिकाराचा पूर्ण वापर करून माझी सत्य भूमिका माननीय सर्वोच्च न्यायालयात जाऊन मांडणार आहे.’
नवनीत राणांच्या खासदारकीवर गंडांतर? नागपूर खंडपीठातील याचिकेवरही लवकरच निकाल लागण्याचे संकेत
‘न्यायदेवतेवर आपला पूर्ण विश्वास असून सर्वोच्च न्यायालयाचे अखत्यारीत असणाऱ्या जातप्रमाणपत्र पडताळणी समिती जिला कायदेशीर दृष्ट्या पूर्ण मान्यता व अधिकार आहेत अश्या न्यायिक समितीने आपल्या सर्व कागदपत्रांची सखोल चौकशी केली व या चौकशीच्या आधारावर आढळलेल्या तथ्यांच्या आधारे सदर जातपडताळणी समितीने माझे जात पडताळणी प्रमाणपत्र वैध असल्याचा या आधी तीन वेळा निर्वाळा दिला आहे.’
‘माननीय न्यायालयाच्या आदेशाची प्रत अजून मिळाली नसून आदरणीय न्यायमूर्तींनी काय निर्वाळा दिला हे अजून विस्तृतपणे मी वाचले नसून निकालाची प्रत मिळाल्यानंतर या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे.’
‘माझे वकील ज्येष्ठ विधिज्ञ ढाकेपालकर व गाडे यांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी 8 आठवड्याचा वेळ मागितला होता कारण सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्या सुरू आहेत.’
‘माननीय न्यायमूर्तींनी त्यांचे म्हणणे ग्राह्य धरून या निकालाला 6 आठवड्यांची स्थगिती दिली आहे व सर्वोच्च न्यायालयात निश्चितपणे माझी बाजू सत्य असल्याचे सिद्ध होईल.’
राणा दाम्पत्याची विनामास्क बुलेटस्वारी, पडणार भारी?
‘जनतेने मला खासदार म्हणून लोकशाही पद्धतीने निवडून दिले असून माझे जनसेवेचे व्रत अखंडपणे सुरूच राहणार आहे. गेल्या 8 वर्षांपासून अमरावती जिल्हयातील नागरिकांच्या सेवेत मी अविरतपणे झटत असून खासदार म्हणून गेल्या 2 वर्षात जिल्ह्याचे, शेतकरी शेतमजूर, गोरगरीब, व्यापारी व महिला-विद्यार्थी यांच्या हिताचे अनेक प्रश्न लोकसभेत पोटतिडकीने मांडले.’
नवनीत राणांची खासदारकी धोक्यात? Bombay High Court ने जात प्रमाणपत्र केलं रद्द
‘कोरोनाकाळात जिल्ह्यांतील लाखो लोकांची अहोरात्र सेवा केली, अनेकांना मदतीचा हात दिला, अमरावती जिल्ह्याच्या विकासात शून्य योगदान असणारे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या आड येऊन एक महिला म्हणून मला त्रास देण्याचे, जिल्ह्याच्या विकासाला बाधा आणण्याचे व माझे खच्चीकरण करण्याचे काम केले.’
‘हे एक राजकीय षडयंत्र आहे. मी संघर्ष करणारी महिला आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा अंतिम असेल व तेथे सत्याचाच विजय होईल. असा माझा विश्वास आहे.’ असं नवनीत राणा यांनी यावेळी म्हटलं आहे. (caste certificate canceled by high court see Navneet Ranas first reaction)
ADVERTISEMENT