Chandrashekhar Bawankule: " महाराष्ट्रासाठी शिंदेंनी घेतलेली भूमिका ...",चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

27 Nov 2024 (अपडेटेड: 27 Nov 2024, 05:29 PM)

Chandrashekhar Bawankule Press Conference : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना फोन करून मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्याचं एकनाथ शिंदेंंनी नुकतच स्पष्ट केलं. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत मोठं विधान केलं.

Chandrashekhar Bawankule On Eknath Shinde

Chandrashekhar Bawankule On Eknath Shinde

follow google news

बातम्या हायलाइट

point

चंद्रशेखर बावनकुळेंनी पत्रकार परिषदेत मोठं भाष्य केलं

point

बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

point

तर एकनाथ शिंदेंचं बावनकुळेंनी केलं कौतुक

Chandrashekhar Bawankule Press Conference : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना फोन करून मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्याचं एकनाथ शिंदेंंनी नुकतच स्पष्ट केलं. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत मोठं विधान केलं. बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस सरकार असताना एकानाथ शिंदेंनी मंत्री म्हणून उत्कृष्ट काम केलं. समृद्धी महामार्गाला देवेंद्रजींच्या सोबत खांद्याला खांदा लावून एव्हढा मोठा महामार्ग पूर्ण केला. उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीला धोका दिला. एकनाथ शिंदेंना न पटल्याने हिंदूत्त्वाची भूमिका घेऊन हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला पुढे नेऊन महाराष्ट्रात पुन्हा शिवशाहीचं सरकार आणण्यासाठी मोठी भूमिका घेतली. महायुतीचे नेते म्हणून आज शिंदेंनी घेतलेली भूमिका महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेसाठी मोठी भूमिका आहे.

हे वाचलं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा आणि आमचं केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्र्याबद्दल करतील, त्या निर्णयाला एकनाथ शिंदेंचं आणि शिवसेनेचं पूर्ण समर्थन राहील. महायुती म्हणून शिंदेंनी अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतली. विरोधी पक्षाच्या तोंडाच्या वाफा सुरु होत्या. त्या वाफा वाफाच राहिल्या. महाराष्ट्राच्या विकासासाठी एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीने काम केलंय. आम्ही आधीपासूनच एकनाथ शिंदेंचं काम बघतोय, असंही बावनकुळे म्हणाले.

हे ही वाचा >> Eknath Shinde Press conference : 'मी मोदी-शाहांना फोन केला...',मुख्यमंत्री पदाबाबत शिंदेंकडून प्रचंड मोठा निर्णय

बावनकुळे पुढे म्हणाले, महाराष्ट्राचे लोकप्रीय मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला विकसित करण्यासाठी मोदींच्या नेतृत्त्वात काम सुरु केलं. फडणीसांच्या खांद्याला खांदा लावून आणि नंतर अजित पवारांची साथ घेऊन डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम केलं. कणखर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी काम केलं. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, सामाजिक समता, सामाजिक न्याय, आदिवासींना न्याय, मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाकरिता शिंदेंनी काम केलं. 

हे ही वाचा >> ladki Bahin Yojana: महिलांनो! 'या' महिन्यात मिळणार लाडकी बहीण योजनेच्या 6 व्या हफ्त्याचे 1500?

महाराष्ट्राच्या जनतेचे पुन्हा एकदा आभार मानतो. हा खूप मोठा विजय आहे. ही लँड स्लाईड विक्ट्री आहे. गेल्या अडीच वर्षात महायुतीने जे काम केलं आहे, त्यावर लोकांनी विश्वास दाखवला आहे. थांबवलेली कामं मविआने पुढे नेली. विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली. हा जनतेचा विजय आहे. आम्ही महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं. मी पहाटेपर्यंत काम करायचो. मी 80-90 सभा घेतल्या. मी पायाला भिंगरी लावून साधा कार्यकर्ता म्हणून काम केलं. मी मुख्यमंत्री म्हणून काम केलं नाही. सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणून मी काम केलं, असं एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

    follow whatsapp