अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांचा तपास केंद्राने केल्यास ‘फटाक्याची माळ’ लागेल: राज ठाकरे

मुंबई तक

• 07:02 AM • 21 Mar 2021

मुंबई: मुख्यमंत्री आणि मुकेश अंबानी यांच्यात मधुर संबंध आहेत आणि ते सर्वश्रुत देखील आहेत. अशावेळी वाझे कुणी सांगितल्याशिवाय बॉम्बची गाडी अंबांनीच्या घराखाली ठेवेल का? त्यामुळे या प्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन चौकशी करावी. ही चौकशी योग्यरित्या झाली तर ‘फटक्यांची माळ’ लागेल.’ अशी प्रतिक्रिया देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अँटेलिया संशयित कार प्रकरणी काही महत्त्वाचे […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: मुख्यमंत्री आणि मुकेश अंबानी यांच्यात मधुर संबंध आहेत आणि ते सर्वश्रुत देखील आहेत. अशावेळी वाझे कुणी सांगितल्याशिवाय बॉम्बची गाडी अंबांनीच्या घराखाली ठेवेल का? त्यामुळे या प्रकरणी केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन चौकशी करावी. ही चौकशी योग्यरित्या झाली तर ‘फटक्यांची माळ’ लागेल.’ अशी प्रतिक्रिया देत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अँटेलिया संशयित कार प्रकरणी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.

हे वाचलं का?

‘या संपूर्ण प्रकरणी राज्य सरकारकडून योग्य चौकशी केली जाणार नाही याची मला खात्री आहे. त्यामुळेच माझी हात जोडून विनंती आहे की, अंबानींच्या घराखाली स्फोटकांनी भरलेली गाडी कुणी ठेवली आणि कुणाच्या सांगण्यावरुन याची चौकशी केंद्र सरकारने केली पाहिजे.’ असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री आणि अंबानी यांचे मधुर संबंध…

‘मुख्यमंत्री आणि अंबानी यांच्यात मधुर संबंध आहेत आणि हे सर्वश्रुतच आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला अंबानी हे सहपरिवार व्यासपीठावर हजर होते. अशावेळी कोणता पोलीस अधिकारी अंबानींकडून पैसे उकळेल? त्यामुळे अंबानींकडून पैसे काढण्यासाठी कट रचला ही थिअरी कुणी काढली मला माहित नाही.’ असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही-शरद पवार

सचिन वाझेला शिवसेनेत प्रवेश कुणी मिळवून दिला?

याच पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी सचिन वाझे यांच्याविषयी देखीस काही प्रश्न उपस्थित केले. ‘सचिन वाझे हा काही वर्षापूर्वी शिवसेनेत होता. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी वाझेंना कोण घेऊन गेलं होतं? अशावेळी वाझेने कुणाच्या सांगण्यावरुन स्फोटकांनी भरलेली गाडी अंबांनीच्या घराखाली ठेवली? स्फोटकं ठेवण्याबाबत कुणाच्या सूचना असल्याशिवाय पोलीस असं धाडस करु शकणार नाही.’ असं म्हणत राज ठाकरेंनी या प्रकरणी केंद्र सरकारकडून सखोल चौकशीची मागणी केली आहे.

मोठी बातमी: शरद पवार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? अजित पवार, जयंत पाटलांना दिल्लीत पाचारण

राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

  • शंभर कोटी दर महिन्याला हवे असं गृहमंत्री सांगतात. अशी घटना राज्य नव्हे तर देशाच्या इतिहासात कधीही घडलेली नाही.

  • आता हे सरकार अस्तित्वात येऊन एक वर्षाहून अधिक झालेलं आहे. त्यामुळे 12 महिने यानुसार 100 कोटी प्रमाणे 1200 कोटी द्यायला हवं. चला कोरोना असल्यामुळे दुकानं बंद असतील म्हणून थोडे फार कमी.

  • मुंबई पोलीस आयुक्तांना का काढलं याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. वाझे प्रकरणानंतर आयुक्तांची फक्त बदली करण्यात आली. जर कारण गंभीर होतं तर त्यांची चौकशी का गेली नाही?

  • हे झालं एका मुंबईच्या आयुक्तांचं, महाराष्ट्रातील अशा किती आयुक्तांना सांगितलं गेलं हे त्यांनाच माहित. त्यामुळे अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे आणि त्यांची कसून चौकशी सुद्धा केली गेली पाहिजे.

  • एखादा गृहमंत्री सांगतोय बारमध्ये जाऊन पैसा गोळा करा हे खूप धक्कादायक आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थिती त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.

  • हे झालं अनिल देशमुखच्याविषयी आता मी या सगळ्यातील महत्त्वाच्या प्रकरणाबाबत बोलणार आहे. ते म्हणजे अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार कुणाच्या सांगण्यावरुन ठेवण्यात आली त्याविषयी.

  • मुख्यमंत्री आणि मुकेश अंबानी यांच्यात मधुर संबंध आहेत आणि ते सर्वश्रुतच आहे. त्यांच्या शपथविधीला अंबानी हे सहपरिवार व्यासपीठावर हजर होते.

  • अशावेळी कोणता पोलीस अधिकारी अंबानीकडून पैसे उकळण्यासाठी प्रयत्न करेल?

  • अंबानींकडून पैसे काढण्यासाठी कट रचला ही थिअरी कुणाची?

  • सचिन वाझे हा काही वर्षापूर्वी शिवसेनेत होता. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी वाझेंना कोण घेऊन गेलं होतं?

  • अशावेळी वाझेने कुणाच्या सांगण्यावरुन स्फोटकांनी भरलेली गाडी अंबांनीच्या घराखाली ठेवली?

  • बॉम्ब ठेवण्यासाठी कुणाच्या सूचना असल्याशिवाय पोलीस असं धाडस करु शकणार नाही.

  • हा विषय वाझे आणि परमबीर सिंग याच्यावर आटोपून चालणार नाही.

  • केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करावा. कारण महाराष्टात याची योग्य चौकशी होऊ शकणार नाही.

  • मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांची चौकशी केंद्राकडून झाली पाहिजे. योग्य चौकशी झाली तर फटाक्यांची माळ लागेल. कोण-कोण आत जातील याची आपण कल्पना करु शकणार नाही.

  • आता त्या गाडीत धमकी देणारं पत्र सापडलं होतं. ज्यामध्ये मुकेश भैय्या आणि नीता भाभी असं म्हटलं होतं. धमकी देणारा माणूस कधी आदराने बोलतो का?

  • त्या पत्रातील टोन पाहिल्यास एखादा गुजराती माणूस हिंदी बोलतो तसा आहे.

  • याविषयी सखोल चौकशी झाल्यास कल्पनेच्या बाहेरचे चेहरे तुमच्यासमोर येतील

  • जर केंद्राकडून देखील या विषयाची योग्य चौकशी झाली नाही तर हा देश अराजकाकडे चालला आहे एवढं निश्चित.

  • पोलीस बॉम्ब ठेवतात हे पहिल्यांदाच ऐकतोय. पोलीस कुणी सांगितल्याशिवाय असं करणार नाही.

  • मुंबई पोलिसांसारखं दुसरं पोलीस दल नाही असं म्हटलं जायचं. पण त्याच पोलिसांची या राजकारण्यांनी वाट लावली आहे.

    follow whatsapp