गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना विषाणूचं थैमान सुरुच आहे, फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीपासून राज्यातील महत्वाच्या शहरांमध्ये रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. अनेक शहरांमध्ये प्रशासनाने याआधीच लॉकडाउन, संचारबंदी असे निर्बंध घालून पाहिले परंतू तरीही रुग्णसंख्या आटोक्यात न आल्यामुळे आता राज्य सरकारने विकेंड लॉकडाउनची घोषणा केली आहे. दरम्यान राज्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता केंद्राने विशेष पथकाची स्थापना केली असून राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये हे पथक राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाला रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्याच्या कामामध्ये मदत करणार आहे.
ADVERTISEMENT
या पथकामध्ये दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. ज्यात एक epidemiologist आणि एक Public Health Expert असणार आहे. हे पथक राज्यातील ज्या ३० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे अशा ठिकाणी जाऊन सर्व कामकाजावर लक्ष ठेवणार आहेत. ज्याच्यात टेस्टिंग योग्य पद्धतीने पार पडलं जात आहे की नाही, व्हेंटीलेटर्स, ऑक्सिजन व इतर महत्वाच्या गोष्टींचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत आहे की नाही यावर हे पथक लक्ष ठेवणार आहे.
२५ वर्षावरील सर्वांना लसीकरणाची परवानगी द्या – मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना विनंती
Testing, Contact Tracing, Suveillance, Containment आणि Hospital Infrastructure या पाच निकषांचा आढावा घेऊन प्रत्येक जिल्ह्यात कसं काम चालत आहे याचा अहवाल ही समिती तयार करणार आहे. केंद्राने महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांसह छत्तीसगडमधील ११ तर पंजाबमधील ९ जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारच्या मदतीसाठी विशेष पथक पाठवलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या अद्यापही अटोक्यात येत नसल्याचं दिसून येतंय. कारण काल पुन्हा एकदा राज्यात तब्बल ४७ हजारांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासात ४७ हजार २८८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर १५५ पॉझिटिव्ह रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे आता आरोग्य खात्याची चिंता वाढली आहे. या सगळ्यात चिंताजनक गोष्ट म्हणजे सध्या राज्यात साडेचार लाखांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
ADVERTISEMENT