पुणे: ‘आमचे देवेंद्र फडणवीस असे दंबग नेते आहेत की, ते अशा 100 अजित पवारांना खिशात घेऊन फिरतात.’ असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पुण्यात पत्रकारांनी त्यांना राज्यातील सत्तासमीकरणाबाबत विचारणा केली असता त्यांनी अशा स्वरुपाचं वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी आणखी एक गौप्यस्फोट देखील केला आहे.
ADVERTISEMENT
‘मागच्या टर्मलाच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याच्या हलचाली करत होते. एका बजेटमध्ये तसे प्रयत्न देखील झाले होते.’ अशी खळबळजनक माहिती चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली आहे.
‘फडणवीस असे 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात’
‘आमचे देवेंद्र फडणवीस हे असे दबंग नेते आहेत की, जे असे 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात. ते काही उद्धव ठाकरेंसारखे नाहीत की, त्यांना माहितच नाही की चाललंय काय. नंतर म्हणतील मला काही माहितच नव्हतंच काय सुरु आहे ते. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या कमी वयाकडे पाहू नका. संपूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेले ते मुख्यमंत्री आहेत. ही गोष्ट काही सोप्पी नव्हती. अनेक वर्षानंतर असं घडलं आहे.’
‘तेव्हा देखील शिवसेनेने आम्हाला प्रचंड त्रास दिला होता. तसंच तेव्हा देखील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रयत्न केला होता की, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी मिळून सरकार स्थापन करावं. एका बजेटमध्ये तसा प्रयत्न देखील झाला होता. पण देवेंद्र फडणवीस हे ठामपणे उभे राहिले आणि टिकले देखील.’
‘2019 विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय ही एक ‘कॅल्क्युलेटेड रिस्क’ होती.’ असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.
दरम्यान, चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांबाबत केलेल्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेमकं कशा पद्धतीने त्यांना उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Kirit Somaiya: ‘किरीट सोमय्या तालिबानी आहेत की दहशतवादी’, दरेकर संतापले
….म्हणून चंद्रकांत पाटलांकडून अजितदादांना केलं जातंय वारंवार टार्गेट?
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून चंद्रकांत पाटील हे सातत्याने त्यांच्यावर टीका करत आहेत. ज्या पुण्यातून चंद्रकांत पाटील हे आमदार म्हणून निवडून आले आहेत त्या जिल्ह्यात अजित पवार यांचं वर्चस्व वाढत चाललेलं दिसत आहे. अशावेळी चंद्रकांत पाटलांसाठी ही धोक्याची घंटा ठरु शकते आणि म्हणूनच चंद्रकांत पाटलांकडून वारंवार अजित पवारांना टार्गेट केलं जात असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
ADVERTISEMENT