Chhaava Box Office Collection: 'छावा' चित्रपटाच्या कमाईच्या वाढत्या आलेखावरुन हे आता जवळपास निश्चित झालंय की, हा चित्रपट या वर्षातील सुपरहिट चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटाच्या कमाईने अवघ्या चार दिवसांतच आपल्या बजेटचा आकडा ओलांडला असून, पाचव्या दिवशी म्हणजे मंगळवारी कमाईत प्रचंड वाढ झाली आहे.
ADVERTISEMENT
लक्ष्मण उतेकर यांच्या या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच मोठी कमाई करायला सुरुवात केली. कमाईचा आणि चित्रपटाच्या पसंतीचा आलेख वरंच जातोय. पहिल्या सोमवारपासून चित्रपटांचा गल्ला कमी होऊ लागतो, पण 'छावा' बॉक्स ऑफिसवर अजूनही हीटच आहे. आता पाचव्या दिवशीही चित्रपटानं चांगली कमाई केली आहे. कमाईच्या बाबतीत, हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.'
हे ही वाचा >>Kalyan Dombivali : कल्याण डोंबिवलीतही पुण्यासारखीच कारवाई होणार, हजारो लोक होणार बेघर, प्रकरण काय?
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित हा चित्रपट प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे. या चित्रपटात विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. विकीने या चित्रपटात आपला जीव ओतला असून, त्याला संपूर्ण कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक चित्रपट छावा असल्याचं म्हटलं जातंय. या चित्रपटाने सोमवारपेक्षा मंगळवारी जास्त कमाई केली.
कमाई 165 कोटी रुपयांच्या वर..
अंदाजे 130 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने जगभरात एकूण 165 कोटींच्या वर कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाने पाचव्या दिवशी म्हणजे पहिल्या मंगळवारी 24.50 कोटी रुपये कमावले आहेत. तर सोमवारी 24 कोटी रुपये कमवले होते.
हे ही वाचा >>Thane Crime News : गुंड कार घेऊन सोसायटीत घुसले, 8 जणांना उडवलं... ठाण्यात घडलेला प्रकार नेमका काय?
जगभरातील कलेक्शनच्या बाबतीत विचार केल्यास चित्रपटाने सुमारे कोटी 200 रुपये कमावले आहेत. चौथ्या दिवशी हा आकडा सुमारे 195 कोटी रुपये होता. त्यामुळे येणाऱ्या काळात हा चित्रपट कोणते रेकॉर्ड मोडणार हे पाहणं महत्वाचं असेल.
ADVERTISEMENT
