Chinchwad bypoll 2023 Rahul Kalate: चिंचवड: चिंचवड विधानसभा मतदारसंघात (chinchwad assembly bypoll) होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी मैदानात उडी घेतल्यानं महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवारासमोर मोठं आव्हान उभ राहिल आहे. शिवसेना (UBT) पक्षाचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांनी निवडणुकीतून माघार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे चिचंवडची पोटनिवडणूक ही तिरंगी होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. स्वत: उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राहुल कलाटे यांनी माघार यावी यासाठी त्यांच्याशी आज फोनवरुन चर्चा केली होती. मात्र, तरीही राहुल कलाटे हे निवडणुकीच्या रिंगणातून मागे हटले नाहीत. त्यामुळे आता महाविकास आघाडीची चिंता बरीच वाढली आहे.
ADVERTISEMENT
आज सकाळपासूनच राहुल कलाटेंच्या मनधरणीचे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होते. राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा म्हणून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा निरोप घेऊन शिवसेनेचे (UBT) नेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी राहुल कलाटे यांची भेट घेतली होती. मात्र या भेटीगाठीचा काहीही परिणाम झाला नाही.
पुणे जिल्ह्यातील चिंचवड आणि शहरातील कसबा पेठ या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध युतीने उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, चिंचवड मतदारसंघातून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
राहुल कलाटे यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांची डोकेदुखी वाढली आहे. अशात शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राहुल कलाटे यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू केले होते. पण कलाटे हे आपल्या मतावर ठाम राहिले.
Thane: राष्ट्रवादीला खिंडार! जगदाळेंसह 5 माजी नगरसेवक जाणार शिंदे गटात
आज (10 फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सकाळपासूनच घडामोडींना वेग आला होता. राहुल कलाटे यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती.
कलाटेंच्या भेटीनंतर सचिन अहिर म्हणाले होते की, “राहुल कलाटे हे आमच्यातीलच एक आहेत. त्यामुळे त्यांची समजूत घालावी म्हणून आणि त्यांचं पुढचं राजकीय भवितव्य अंधारमय होऊ नये म्हणून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आग्रही मागणी केली. आता सर्व माहिती देणं उचित नाही.”
Exclusive: शिवसेना कोणाची? ‘निवडणूक आयोग लाखो प्रतिज्ञापत्र बघत नाही’, माजी आयुक्तांची मुलाखत
उद्धव ठाकरे यांनी राहुल कलाटेंना काय सांगितलं?
सचिन अहिर पुढे म्हणाले की, “पक्षप्रमुखांचा (उद्धव ठाकरे) निरोप घेऊन मी आलो होतो. पक्षप्रमुखांनीही त्यांना सांगितलं की, तुम्ही तरुण आहात. यामध्ये काही झालं असलं, तरी महाविकास आघाडी नेता या नात्याने ते असतील किंवा त्यांच्यासोबतचे… भविष्यकाळात कशा प्रकारे राजकीय दृष्टिकोनातून मदत करता येईल. त्याबद्दल चर्चा करू शकतो. ते करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला चांगलं राजकीय भवितव्य असल्यामुळे तुम्ही यातून माघार घ्यावी, असा निरोप त्यांना दिला आहे.”
“त्यांनी (राहुल कलाटे) पक्षप्रमुखांशी (उद्धव ठाकरे) फोनवरून बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं बोलणं झालं नाही. आज त्यांचं (राहुल कलाटे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालेलं आहे. मला असं वाटतं की पुढचं तेच बोलतील. दोघांमध्ये काय बोलणं झालं, हा संवाद त्यांच्यामध्येच आहे. आम्ही त्यांना विनंती केली आहे”, असं सचिन अहिर यांनी सांगितलं.
शांत डोक्याने विचार करा…, उद्धव ठाकरेंचा कलाटेंना सल्ला
“पक्षप्रमुखांचं ऐकून घेतल्यानंतर त्यांनी लगेच प्रतिक्रिया दिली नाही. पक्षप्रमुखांनीही त्यांना सांगितलं की, ‘शांत डोक्याने विचार करा आणि या गोष्टीबद्दल कळवा.’ आता आम्हाला अपेक्षा आहे की, आमचा आग्रह ग्राह्य धरून ते उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं काम ते करतील”, असं अहिर माध्यमांशी बोलताना म्हणाले.
Kasba Peth By Poll : हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर; कोणाची किती संपत्ती?
राहुल कलाटे यांनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक
“त्यांचं असं मत आहे की एकटा निर्णय घेऊ शकणार नाही. कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासोबत त्यांनी बैठक बोलावली आहे. आम्ही आशावादी आहोत की ते चांगला निर्णय घेतील. ते महाविका आघाडीच्या उमेदवारासोबत राहतील. ते लवकरच त्यांची भूमिका जाहीर करतील”, अशी माहिती सचिन अहिर यांनी दिली.
ADVERTISEMENT