ADVERTISEMENT
सध्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी चीनमधील बीजिंग आणि शांघायमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे.
या सगळ्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
असं म्हटलं जात आहे की, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे सेरेब्रल एन्यूरिज्म नावाच्या आजाराने ग्रस्त आहेत.
एवढंच नव्हे तर 2021 सालच्या अखेरीस त्यांना रुग्णालयात दाखल देखील करण्यात आलं होतं. मीडिया रिपोर्ट्समध्ये याबाबत दावा करण्यात आला आहे.
रिपोट्सनुसार, शी जिनपिंग यांनी सर्जरी करण्याऐवजी पारंपारिक चीनी औषधं घेऊन उपचार करण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आरोग्याबाबत मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा समोर येत आहेत.
ADVERTISEMENT