Devendra Fadnavis meets Raj Thackeray : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दल माहिती समोर आली नसली तरी, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीमध्ये चर्चा होणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. राज्यात अडीच वर्षांपूर्वी जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि महायुतीचं सरकार आलं, त्यानंतर राज ठाकरे आणि महायुतीच्या नेत्यांच्या भेटीची मालिका पाहायला मिळाली होती. संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी आता या भेटीवरुन राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Jitendra Awhad : ."..तर हिमालयात जाऊन साधूसंत व्हा आणि वाल्मिकलाही माफ करा"; आव्हाड सुरेश धसांवर बरसले
राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर कॅफे उघडलाय, त्यामुळे लोक तिथे जात असतात चहापान करायला, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला. तर सुषमा अंधारे म्हणाल्या, "राज ठाकरे यांच्याकडे कोण जातं, कुणाशी बोलतात याने राजकारणात फार उलथापालथ होईल असं वाटत नाही. महाराष्ट्रातली जनताच काय, तर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनाही ही गोष्ट सवयीची झाली आहे की, राज ठाकरे भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतात आणि निवडणूक आली की, त्यांच्या प्रो भाजप भूमिका होतात. आताही ज्या भेटीगाठी दाखवायचा प्रयत्न होतोय, त्या महापालिकेच्या संबंधाने असू शकतात असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत."
काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी केली होती महायुतीवर टीका
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी वरळीमध्ये पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित केलं होतं. यावेळी राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आक्रमकपणे बोलले होते. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर कुणाचाच विश्वास बसू शकत नाही, राज्यात अनेक ठिकाणी समोर आलेले आकडे हे न पटणारे आहेत असं राज ठाकरे म्हणाले. राज्यात एवढं मोठं यश मिळूनही शांतता होती असं म्हणत राज ठाकरे यांनी महायुतीला मिळालेल्या यशावर अप्रत्यक्षपणे शंका उपस्थित केली होती.
हे ही वाचा >> Jitendra Awhad : "...नाहीतर मी तुला झोडणार, तुझी लायकी काय?", राहुल सोलापूरकरला जितेंद्र आव्हाड यांचा थेट इशारा
राज ठाकरे यांनी या राजकीय भेटीगाठींवर मिश्किल टिपण्णी करत आपली भूमिका स्पष्ट केली होती. नेते मंडळी भेटीगाठीसाठी येतात, सदिच्छा भेटीला येतात, तर मी काय त्यांना येऊ नका असं सांगू का? असं राज ठाकरे म्हणाले होते. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या भेटीबद्दलचा एक किस्साही सांगितला होता.
ADVERTISEMENT
