ठाण्यातल्या टेंभी नाक्यातल्या नवरात्र उत्सवात आनंद दिघेंचे दोन कट्टर शिष्य समोरासमोर

मुंबई तक

• 03:48 PM • 26 Sep 2022

शिवसेनेत झालेल्या मोठ्या फुटीनंतर ठाण्यात सुरू झालेल्या नवरात्र उत्सवाची चर्चा चांगलीच रंगली आहे. ठाण्यातल्या टेंभीनाका भागात जो देवीचा उत्सव होतो तो धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केला. शिवसेनेतल्या फुटीनंतर पहिल्यांदाच नवरात्र उत्सव उत्साहात साजरा होतो आहे. अशात या नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी आनंद दिघे यांचे दोन कट्टर शिष्य आमनेसामने आले होते. काय घडलं नवरात्र उत्सवात? […]

Mumbaitak
follow google news

शिवसेनेत झालेल्या मोठ्या फुटीनंतर ठाण्यात सुरू झालेल्या नवरात्र उत्सवाची चर्चा चांगलीच रंगली आहे. ठाण्यातल्या टेंभीनाका भागात जो देवीचा उत्सव होतो तो धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केला. शिवसेनेतल्या फुटीनंतर पहिल्यांदाच नवरात्र उत्सव उत्साहात साजरा होतो आहे. अशात या नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी आनंद दिघे यांचे दोन कट्टर शिष्य आमनेसामने आले होते.

हे वाचलं का?

काय घडलं नवरात्र उत्सवात?

ठाण्यातल्या टेंभी नाका भागात असलेल्या नवरात्र उत्सवात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंसोबत राहिलेले खासदार राजन विचारे हे दोघेही आले होते. आनंद दिघे यांचे दोन कट्टर शिष्य या उत्सवाच्या निमित्ताने समोरासमोर आल्याचं पाहण्यास मिळालं.

ठाण्यातला उत्सव आनंद दिघेंनी केला सुरू

ठाण्यातल्या टेंभी नाका भागात ४४ वर्षांपूर्वी आनंद दिघे यांनी नवरात्र उत्सव सुरू केला होता. त्यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांनी हाच वारसा पुढे सुरू ठेवला. आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे आणि राजन विचारे हे दरवर्षी या देवीच्या दर्शनाला येतात. यावर्षी मात्र दोघं समोरासमोर आलेले पाहण्यास मिळाले. कारण एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर हा पहिलाच नवरात्र उत्सव आहे.

आज झालेल्या नवरात्र उत्सवात राजन विचारे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमनेसामने आलेले पाहण्यास मिळाले. आजच बाळासाहेब ठाकरे यांची सावली असलेले थापा यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी जे बंड केलं त्यानंतर राजन विचारे हे त्यांच्यासोबत गेले नाहीत. राजन विचारे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. एक गट आहे तो म्हणजे ठाकरे गट आणि दुसरा आहे तो शिंदे गट. शिंदे गटाकडून ठाकरे गटाची शिवसेना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तर उद्धव ठाकरे हे शिवसेना आणखी फुटू नये म्हणून पूर्ण प्रयत्न करत आहेत.

अशात आज ठाण्यातल्या नवरात्र उत्सवात राजन विचारे आणि एकनाथ शिंदे हे दोघंही आनंद दिघे यांचे कट्टर शिष्य समोरासमोर एकत्र आलेले पाहण्यास मिळाले. टेंभी नाका या ठिकाणी उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उपस्थित राहून देवीची पूजा केली. त्यांच्या उपस्थिती देवीच्या आगमानाला सुरूवात झाली. या ठिकाणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि अनेक शिवसैनिक उपस्थित होते. राजन विचारे आणि केदार दिघे यांनी देवीच्या रथाचा गाडा ओढला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवीच्या आगमन मिरवणुकीत समर्थकांची आणि नागरिकांची भेट घेतली.

    follow whatsapp