मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मणक्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, लवकरच त्यांना एच.एन. रिलायन्स रुग्णालयातून लवकरच डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान आणि मणक्याचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्यांना मानेला कॉलर लावावी लागत होती. अनेक कार्यक्रमात ते कॉलर लावून उपस्थित होती. मान आणि मणक्याच्या त्रास उद्भवल्याने उद्धव ठाकरे एच.एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते.
विविध चाचण्या करण्यात आल्यानंतर त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मणक्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील स्पाईन सर्जरी यशस्वी झाली असून, त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर आहे. सध्या एच. एन. रिलायन्स रुग्णालयात त्यांची फिजिओथेरपी सुरू आहे. त्यांना योग्यवेळी डिस्चार्ज देण्यात येईल, असं रुग्णालयाच्यावतीनं स्पष्ट करण्यात आले आहे”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT