आलिया भटने मुलीला जन्म दिला आहे. आलिया भटची डिलिव्हरी एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये झाली आहे. आलिया आणि रणबीर आई बाबा झाले आहेत. या बातमीनंतर कपूर आणि भट घराण्यात जल्लोषाचा माहोल आहे. आलिया भट आणि रणबीर कपूरवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. आलिया भटला आज सकाळी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने थोड्याचवेळापूर्वी मुलीला जन्म दिला आहे.
ADVERTISEMENT
एच. एन. रिलायन्स रूग्णालयात आलियाची डिलिव्हरी
एच. एन. रिलायन्स या रूग्णालयात आलियाची प्रसुती झाली आहे. आलिया आणि रणबीर कपूर आई बाबा झाले तेव्हा कपूर घराण्यात आणि भट घराण्यात आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे. नवी पाहुणी आल्याने दोन्ही कुटुंबात उत्साह आहे. सगळेच आलिया आणि रणबीरचं अभिनंदन करत आहेत.
सेलिब्रिटीही करत आहेत अभिनंदनाचा वर्षाव
रणबीर कपूर आणि आलियाचं सेलिब्रिटीही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. रणबीर आलिया यांच्यासाठी लोक दुवाही मागत आहेत तसंच त्यांना शुभेच्छाही देत आहेत. आलिया भट आई झाल्याची बातमी समोर आल्यानंतर कौतुकाचा वर्षाव केला जातो आहे.
बाळाच्या जन्मानंतर आलिया भट्ट आता एका वर्षाचा ब्रेक घेणार आहे. आलिया भट्टने मॅटरनिटी लीव्हवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. बाळासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा यासाठी आलियाने हा निर्णय घेतला आहे. ब्रेकवर जाण्यासाठी आलियाने आगामी सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे.
काही दिवसांपूर्वी आलिया आणि रणबीरचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटातील आलिया आणि रणबीरच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आलिया गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बेबी बंप फ्लॉन्स करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. आता आलिया आणि रणबीरला कन्यारत्न झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक जण त्यांना शुभेच्छा देत आहेत.
आता आलिया आणि रणवीर सिंहचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडमध्ये झळकल्यानंतर आलिया आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज आहे. तिचा ‘हार्ट ऑफ स्टोन’ हा हॉलिवूड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ADVERTISEMENT