काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची अवस्था टायटॅनिकसारखी-नारायण राणे

मुंबई तक

• 09:12 AM • 06 Dec 2021

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची अवस्था टायटॅनिकसारखी झाली आहे असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही आज पुण्यात आहेत. पुणे महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आज एक बैठक पुण्यात घेण्यात आली. या बैठकीसाठी नारायण राणे जेव्हा आले तेव्हा हे वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे. शिवसेना यूपीएमध्ये जाणार अशी चर्चा […]

Mumbaitak
follow google news

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची अवस्था टायटॅनिकसारखी झाली आहे असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही आज पुण्यात आहेत. पुणे महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आज एक बैठक पुण्यात घेण्यात आली. या बैठकीसाठी नारायण राणे जेव्हा आले तेव्हा हे वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

शिवसेना यूपीएमध्ये जाणार अशी चर्चा आहे. त्याबाबत विचारलं असता नारायण राणे म्हणाले की शिवसेनेने महाराष्ट्राच्या सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवलं आहे. ते यूपीएसोबत जात आहेत तर मग हिंदुत्वाचं काय? खुर्चीसाठी ते गुंडाळूनच ठेवलं ना असं नारायण राणे म्हणाले.

नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म आणि लघू उद्योग, सरकार पाडणं मोठा उद्योग; संजय राऊत यांचा टोला

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही काही दिवसांपूर्वी पुण्याचा दौरा केला, त्यावेळी त्यांनी पुणे महापालिका शिवसेना जिंकणार असं म्हटलं होतं. यावर प्रश्न विचारला असता नारायण राणे म्हणाले ते सगळीकडे असंच बोलत असतात. तुम्ही तरी बघा शक्य आहे का? संजय राऊत हे तर दिल्लीत आमची सत्ता येईल असं सांगतात मात्र ते शक्य आहे का? फुगवून फुगवून ते बोलत असतात, ते फुटले की त्याला म्हणतात संजय राऊत असा टोलाही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

टायटॅनिकच्या होडीत कुणी बसणार नाही. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तिघांची अवस्था टायटॅनिकसाऱखी आहे. आमची बोट सेफ आहे एकदा बसलं की थेट दिल्लीत जाता येतं. त्यामुळे पुणे महापालिकेच्या तोंडावर भाजपमध्ये फाटाफूट होईल असं काहीही घडणार नाही असंही राणे यांनी म्हटलं आहे.

अधिवेशनाच्या मुद्द्यावरूनही नरायण राणेंनी टीका केली. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर सरकार काळजी असल्याचं दाखवतं आहे मात्र तशी काही परिस्थिती आत्ता तरी दिसत नाही. अधिवेशन कमी दिवसाचं घेण्यासाठी हे सगळं सुरू आहे. या सरकारने शेतकरी, कष्टकरी समाज, नोकरदार सगळ्यांची फसवणूक केली आहे असाही आरोप यावेळी नारायण राणेंनी म्हटलं आहे.

मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपचं सरकार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दावा

नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं की मार्चमध्ये सत्ता बदल होईल. याबाबत विचारलं असता, नारायण राणे म्हणाले की तो आमचा अंतर्गत विषय आहे. सरकार कसं पडेल ते आम्ही सांगणार नाही. पत्रकारांना आम्ही ते सांगणार नाही. वेळ आली की ते योग्य ते सगळं करू असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

    follow whatsapp