काँग्रेस नेते राहुल गांधी हे लंडन येथील केम्ब्रिज विद्यापीठाच्या आयडियाच फॉर इंडिया या संमेलनात सहभागी झाले आहेत. शुक्रवारी त्यांनी भाजपवर कडाडून टीका केली. राहुल गांधी म्हणाले की काँग्रेसला भारत आधी जसा होता तसा घडवायचा आहे त्यामुळेच वाद सुरू आहे. भाजपकडून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले राहुल गांधी?
काँग्रेस पक्षाला हे वाटतं आहे की भारत जसा आधी होता तसा तो व्हावा. भारताला ते स्थान पुन्हा मिळावं म्हणून आम्ही लढतो आहोत. मात्र भाजपकडून लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे, आम्ही लोकांचा आवाज ऐकतो आहोत. भारतात सध्या अशा संस्थांवर हल्ला केला जातो आहे ज्या संस्थांचा या देशाच्या निर्मितीत मोठा सहभाग होता. आयडीआज फॉर इंडिया संमेलनात राहुल गांधींसोबत सीताराम येचुरी, सलमान खुर्शीद, तेजस्वी यादव, महुआ मोईत्रा आणि मनोज झा हे नेतेही सहभागी झाले आहेत.
राहुल गांधी म्हणाले की भाजप सरकार आल्यापासून बेरोजगारी वाढली आहे. एवढंच नाही तर ध्रुवीकरणही वाढलं आहे. भारतात चांगलं वातावरण सध्या नाही. भाजप चारही बाजूंनी रॉकेल ओतण्याचं काम करतं आहे. आम्हाला भारताची ही प्रतिमा पुन्हा एकदा बनवायची आहे जिथे वेगवेगळे विचार मांडले जाऊ शकतात. तसंच चर्चाही घडू शकतात.
राहुल गांधी यांना लोकशाहीबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा राहुल गांधी म्हणाले की प्रत्येक संस्थेवर भाजप हल्ला करतं आहे. राहुल गांधी म्हणाले की भाजप लोकांना बोलू देत नाही त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आम्ही लोकांचा आवाज ऐकायचा आहे.
राहुल म्हणाले, भाजप सरकार आणि आरएसएस देशाला भूगोल म्हणून पाहतात. पण आमच्यासाठी, आमच्या पक्षासाठी भारत हा माणसांचा बनलेला आहे. मात्र, पक्षात सध्या अंतर्गत कलह, बंडखोरी, निवडणुकीत पराभव होत असल्याचे राहुल यांनी नाकारले नाही. भारतातील परिस्थिती सध्या चांगली नाही यावर राहुल यांनी भर दिला. भाजपवर आरोप करताना ते म्हणाले की, देशात रॉकेल शिंपडण्याचे काम भाजप करत आहे. एक ठिणगी आग लावू शकते. ही उष्णता शमविण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे.
केंद्र सरकारवर सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर केल्याचा आरोप करत भारताची तुलना पाकिस्तानशी केली आहे. आरएसएसवर टीका करताना राहुल म्हणाले की, RSS साठी भारत सोन्याचा पक्षी आहे आणि कर्माच्या आधारे आपला वाटा वाटून घ्यायचा आहे, ज्यामध्ये दलितांना स्थान नाही. याशिवाय राहुल गांधींनी काँग्रेसच्या पराभवाचे श्रेय ध्रुवीकरण आणि मीडिया कंट्रोलला दिले. ते म्हणाले की आरएसएसने लोकांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्षांनीही असेच केले पाहिजे आणि त्या 60-70% लोकांना एकत्र केले पाहिजे, जे त्यांना मत देत नाहीत असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT