औरंगाबादमध्ये 11 मार्चपासून अंशत: लॉकडाऊन, वीकेंडला सगळं काही बंद!

मुंबई तक

• 03:49 PM • 07 Mar 2021

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात पूर्णपणे लॉकडाऊन लावण्याचा अद्याप विचार नाही. मात्र 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत अंशतः लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून शनिवार आणि रविवार मात्र पूर्णतः बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत नवीन निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान, गेल्या […]

Mumbaitak
follow google news

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात पूर्णपणे लॉकडाऊन लावण्याचा अद्याप विचार नाही. मात्र 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत अंशतः लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून शनिवार आणि रविवार मात्र पूर्णतः बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत नवीन निर्णय घेण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

दरम्यान, गेल्या 24 तासात औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल 532 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता खबरदारीचा उपाय म्हणून येथे प्रशासनाने अंशत: लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन

11 मार्चपासून रात्री बारा वाजेपासून ते 4 एप्रिल पर्यंत नवीन नियमावली लागू होणार आहे. सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सर्वसामान्य व्यवहार सुरू असतील. याकाळात राजकीय, सामाजिक सभा, धार्मिक स्थळं आणि कार्यक्रम, आठवडी बाजार, क्रीडा स्पर्धा, शाळा, महाविद्यालय, बंद असणार आहे. मात्र, यानंतर देखील रुग्ण वाढले तर पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा विचार केला जाऊ शकतो.

अकोल्यात लॉकडाऊन असून देखील एका दिवसात 248 Corona रुग्ण

अत्यावश्यक सेवा वगळता वीकेंडला असणार कडक लॉकडाऊन

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता काही नवीन नियम नागरिकांना पाळावे लागणार आहेत. यामध्ये दर शनिवार आणि रविवार बाजारपेठा पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रोज रात्री नऊ वाजता सर्व बाजारपेठा बंद होतील. हॉटेल व्यवसायिकांना मात्र रात्री नऊनंतर रात्री अकरापर्यंत घरपोच सेवा देण्यासाठी मुभा असेल. मात्र शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन असणार आहे. यावेळी अत्यावशक सेवाल वगळता बाकी सगळ्या गोष्टी बंद राहणार आहेत. तसेच आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला दर पंधरा दिवसांनी कोविड तपासणी करणं अनिवार्य असणार आहे. तपासणी झाल्यानंतर त्याचा अहवाल त्यांच्याकडे असणे गरजेचे आहे. याबाबत तपासणी करण्यासाठी वेगळी यंत्रणा सज्ज करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

विवाह सोहळ्यांवर निर्बंध…

मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः विवाह सोहळ्यांमध्ये होणारी गर्दी ही प्रशासनासमोरील सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळेच 11 मार्च ते 4 एप्रिल यादरम्यान जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालयं आणि लॉन्स बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहेय या काळात कोणालाही विवाह करता येणार नाही. विवाह करण्याची वेळ आल्यास त्यांच्यासाठी शासकीय नोंदणी पद्धतीने विवाह करण्याची मुभा मात्र देण्यात आली आहे. या काळामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेऊन पुढील निर्बंध कसे असतील याची नियमावली ठरवण्यात येईल. असा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जाहीर केला.

मुंबईत पुन्हा लॉकडाऊन? एक हजारापेक्षा जास्त इमारती सील

11 मार्चपासून सात दिवस भाजी मंडई बंद

कोरोना रुग्णवाढीसाठी गर्दीचं ठिकाणं महत्त्वाची ठरत आहेत. त्यामुळेच 11 मार्चपासून पुढील सात दिवसासाठी जाधववाडी येथील मोठी भाजी मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सात दिवसात तिथल्या व्यापाऱ्यांनी भाजी मंडईत कमी गर्दी करून कशा पद्धतीने व्यवसाय करता येईल किंवा कशा पद्धतीने नियम लावून कोरोनाचा संसर्ग टाळता येईल याबाबत माहिती दिल्यास पुढील योग्य तो निर्णय घेण्यात येईल. मात्र तोपर्यंत पहिले सात दिवस भाजी मंडी पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतकंच नाही तर 11 मार्चपासून तर चार एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. याचबरोबर धार्मिक स्थळ हे देखील बंद असतील. ग्रंथालय अर्धा क्षमतेने चालू ठेवण्याचा निर्णय असला तरी शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवण्याची मुभा असेल अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.

    follow whatsapp