– मनिष जोग, जळगाव प्रतिनिधी
ADVERTISEMENT
दोन जातींमधले भेद कमी व्हावेत यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक सामाजिक सुधारणावादी नेत्यांचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. नेहमी महाराष्ट्र आपल्याला पुरोगामित्वाच्या गप्पा ऐकायला मिळत असतात. परंतू याच महाष्ट्राची मान शरमेने खाली जाईल अशी एक घटना जळगावमघ्ये घडली आहे. पारोळा तालुक्यातील बाभळेनाग येथील आंतरजातीय विवाह करणाऱ्या एका जोडप्याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे लग्न झाल्यानंतर या जोडप्याचा गावातील लोकांनी छळ सुरु केला आहे. काही दिवसांपूर्वी दोघांनीही गाव सोडून जावं म्हणून तरुणाच्या घरातील सदस्यांना अश्लील शिवीगाळ करत मारहाणही करण्यात आली होती. इतका प्रकार घडूनही स्थानिक पोलीस ठाण्याने याची दखल घेतली नाही. अखेरीस या जोडप्याने जळगावचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे धाव घेत मदत मागितली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हे तरुण-तरुणी चार वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात दोघांनीही आंतरजातीय विवाह केला. या लग्नाला मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. विवाह झाल्यानंतर मुलीच्या घरच्यांकडून दोघांनाही त्रास देण्यास सुरुवात झाली. इतकच नव्हे तर गावातील इतर लोकंही त्यांचा छळ करायला लागले. तरुणाच्या कुटुंबाने हे गाव सोडून जावं यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात झाली.
संसार सुरळीत चालवण्यासाठी तो चोर बनला, नागपूर पोलिसांनी केली अटक
आंतरजातीय विवाह करणारं जोडपं हे पदवीधर आहे आणि त्यांनी आपापसातल्या सहमतीने लग्न केलं आहे. तरीही घरातल्या लोकांकडून होणारा विरोध आणि जिवे मारण्याच्या धमक्यांमुळे आपल्याला न्याय मिळावा अशी विनंती या जोडप्याने पोलिसांना केली आहे. या जोडप्याची कैफीयत ऐकल्यानंतर दोघांनाही पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय पोलीस अधिक्षक प्रवीण मुंढे यांनी घेतला आहे.
जळगाव : पोस्टाने कारणे दाखवा नोटीस मिळालेल्या ST कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
ADVERTISEMENT