गोमूत्र हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं. इतकंच काय तर अनेकजण ते दररोज प्राशनही करतात. जर कदाचित तुम्हीही कधीतरी गोमूत्र प्राशन करत असाल, तर थांबा. कारण एक महत्त्वाची माहिती संशोधनातून समोर आली आहे. आयव्हीआरआय अर्थात भारतीय पशू संशोधन संस्थेच्या संशोधनातून गोमूत्राचे दुष्परिणाम समोर आले आहेत.
ADVERTISEMENT
पशूसंदर्भात संशोधन करणाऱ्या देशातील प्रतिष्ठीत संस्थेनं गोमूत्राबद्दल अभ्यास केला. यातून काही महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. संशोधनात आढळून आलेल्या माहितीच्या आधारे संस्थेनं ताज गोमूत्र पिणं मानवी शरीरासाठी घातक असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे गोमूत्रापेक्षा म्हशीचं मूत्र जास्त परिणामकारक असल्याचं या संशोधनाअंती शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
गोमूत्र शरीरासाठी घातक कसं, संशोधन करणारे संशोधक कोण?
बरेली येथील भारतीय पशू संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी गोमूत्राबद्दलचा अभ्यास केला आहे. भोज राज सिंह यांच्या नेतृत्वाखालील तीन पीएच.डी विद्यार्थ्यांनी यावर संशोधन केलं. या संशोधकांना गोमूत्र आणि गोवंशाच्या मूत्रामध्ये मानवी शरीरासाठी घातक ठरणारे 14 प्रकारचे विषाणू आढळून आले. यात पोटाचे विकारासाठी कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूचाही समावेश आहे.
हेही वाचा >> Covid 19 : नव्या व्हेरिएंटचा ‘या’ लोकांना जास्त धोका, यात तुम्ही तर नाही ना?
संशोधकांनी केलेले संशोधन रिसर्चगेट या साईटवर प्रसिद्धही झाला आहे. या संशोधनाबद्दल भोज राज सिंह यांनी सांगितलं की, “गायीच्या 73 प्रकारच्या मूत्राचे नमून्यांचं सांख्यिकी पद्धतीने विश्लेषण करण्यात आलं. गोमूत्रापेक्षा म्हशीच्या मूत्रामध्ये विषाणूविरोधी घटक जास्त असतात. S Epidermidis and E Rhapontici या विषाणूविरोधात म्हशीचं मूत्र अधिक परिणामकारक आहे, असं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा >> मधुमेहाच्या रूग्णांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी रिकाम्या पोटी ‘या’ गोष्टींचे करा सेवन…
तीन प्रकारच्या गायींच्या गोमूत्राचं परीक्षण
सिंह यांनी सांगितलं की, “आम्ही तीन प्रकारच्या गायीचं गोमूत्र घेतलं. स्थानिक गोशाळेतून सहीवाल, थारपरकर, विंदवाणी गायीचे मूत्र घेतले. त्याचबरोबर म्हशीचे आणि माणसाचंही मूत्र घेतले होतं. जून ते नोव्हेंबर 2022 या काळात आम्ही संशोधन केलं. यातून असं आढळून आलं की विशिष्ट स्वरूपात घेतलेले गोमूत्र आरोग्यासाठी हानीकारक आहे.”
ADVERTISEMENT