Crime News in marathi :
ADVERTISEMENT
जमशेदपूर : झारखंडमधील परसुडीहमध्ये प्रेयसीनेच प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुजारी सुबोध पांडे असं प्रियकराचं नाव असून शारदा तिवारी असं प्रेयसीचं नावं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हत्येपूर्वी दोघांनीही रात्रभर शारिरीक संबंध ठेवले होते. मात्र त्यानंतर प्रियकराची हत्या करुन मृतदेह खोलीत टाकून प्रेयसी फरार झाली होती. दरम्यान, आता पोलिसांनी शारदा तिवारीला अटक केली असून चौकशीनंतर तिने हत्येची कबुली दिली आहे. (Both had sex throughout the night. But after killing the lover and leaving the dead body in the room, the lover absconded.)
नेमकं काय घडलं होतं?
शारदाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शारदा आणि सुबोध या दोघांचाही विवाह झाला होता. यात शारदाला तीन मुले तर सुबोधला दोन मुली आणि दोन मुले आहेत. मात्र त्यानंतर देखील दोघे विवाहबाह्य संबंध ठेवून होते. गेल्या एक वर्षापासून दोघेही भाड्याचे घरात लिव्ह-इन-रिलेशनमध्ये राहत होते.
पोलिसांसमोर खुलासा करताना शारदाने सांगितलं की, दोघांनी हत्येच्या रात्री म्हणजेच २ मार्चला दारू पिली होती. दारू पिऊन दोघांनी शारीरिक संबंधही ठेवले होते. मात्र रात्री दोघांमध्ये काही कारणावरून वाद सुरू झाला. दोघांमध्ये बाचाबाचीही झाली. याच दरम्यान, सुबोधने रागाच्या भरात फास काढला आणि स्टूलवर चढला. यावेळी रागाच्या भरात शारदाने सुबोधच्या स्टूलला धक्का दिला आणि सुबोधच शरीर फाशीच्या फंद्यात अडकलं.
mumbai crime : लालबाग हादरलं! कपाटात सापडला महिलेचा मृतदेह, मुलीला अटक
पण त्यानंतर शारदाने सुबोधचा जीव वाचवू नये म्हणून त्याचा गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर शारदाने मृतदेह खोलीत टाकून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी चार दिवसांनी म्हणजेच ६ मार्चला पुजारी सुबोध पांडेचा मृतदेह ताब्यात घेतला. शारदाने पोलिसांना सांगितलं की पुजारीने तिला जाळ्यात ओढून तिचे दागिने आणि शेत विकलं. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार भांडणं व्हायची. शारदाने जेव्हा पैसे परत मागितले तेव्हा सुबोध तिला मारहाण करायचा. यामुळेच शारदाने संधी पाहून सुबोधची हत्या केली.
ADVERTISEMENT