Financial Fraud : भरगोस परताव्याच्या नादात कोट्यवधींची गुंतवणूक, ठाण्यात 20 जणांना गंडा घातला

जेव्हा गुंतवणूकदारांनी दहिसर पोलिस स्टेशनशी संपर्क साधला तेव्हा त्याला कळले की इतर अनेक लोक देखील त्याच फसवणुकीचे बळी ठरले आहेत. एकूण, सुमारे 20 जणांची एकत्रितपणे 12.7 कोटी रुपयांची फसवणूक झाली, असं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.

Mumbai Tak

मुंबई तक

27 Feb 2025 (अपडेटेड: 27 Feb 2025, 01:51 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भरगोस परताव्याच्या आशेनं कोट्यवधींचं नुकसान

point

20 जणांचे 12 कोटी रुपये घेऊन आरोपी फरार?

point

ओळखीच्या माणसानं दिला होता गुंतवणुकीचा सल्ला

गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याचं आमिष दाखवून जवळपास 20 लोकांना 12.7 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका खाजगी कंपनीत वरिष्ठ कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कांदिवलीतील रहिवाशाच्या तक्रारीवरून हा एफआयआर नोंदवण्यात आला.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Vasant More : वसंत मोरेंना थेट मातोश्रीवरुन फोन, स्वारगेटवर तोडफोड केल्यानंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

तक्रारदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी एका ओळखीच्या व्यक्तीने त्याच्याशी संपर्क साधला आणि आकर्षक परतावा देऊ असा दावा करून काही लाख रुपये एका योजनेत गुंतवायला सांगितले. मात्र गुंतवणुकीवर कोणताही परतावा मिळाला नाही. जेव्हा त्या व्यक्तिला पैसे परत मागण्यासाठी फोन केला, ती व्यक्ती टाळाटाळ करू लागली, असं तक्रारीत म्हटल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हे ही वाचा >>Pune : स्वारगेट केसमधील आरोपी फरार? पोलिसांकडून एक लाखाचं बक्षीस, राष्ट्रीय महिला आयोगनं घेतली दखल

जेव्हा गुंतवणूकदारांनी दहिसर पोलिस स्टेशनशी संपर्क साधला तेव्हा त्याला कळले की इतर अनेक लोक देखील त्याच फसवणुकीचे बळी ठरले आहेत. एकूण, सुमारे 20 जणांची एकत्रितपणे 12.7 कोटी रुपयांची फसवणूक झाली, असं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. या प्रकरणात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी टोरेस स्कॅम सारखा मोठा घोटाळा समोर आला आहे. भरगोस परतावा मिळवण्याच्या नादात लोक आयुष्यभराची जमापुंजी अशा योजनांमध्ये गुंतवतात आणि पदरी निराशा पडते. त्यामुळे अशा आकर्षक परतावा देणाऱ्या योजनांपासून सावध राहण्याचं आवाहन पोलीस वारंवार करत असतात. 


    follow whatsapp