दरोड्याच्या घटनांनी सोलापूर हादरलं, दरोडेखोरांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; महिला जखमी

मुंबई तक

• 10:00 AM • 09 Mar 2022

सोलापूर – हैदराबाद महामार्गावरील बोरामणी येथील दर्गनहळ्ळी रस्त्यावर दरोडेखोरांनी दोन ठिकाणी दरोडे टाकले आहेत. या दरोड्याच्या घटनांमध्ये हल्लेखोरांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाली आहे. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. बुधवारची मध्यरात्री एक ते दीडच्या दरम्यान पाच ते सात दरोडेखोरांनी बोरामणी ते दर्गनहळ्ळी रस्त्यावरील शेतातील वस्तीवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. […]

Mumbaitak
follow google news

सोलापूर – हैदराबाद महामार्गावरील बोरामणी येथील दर्गनहळ्ळी रस्त्यावर दरोडेखोरांनी दोन ठिकाणी दरोडे टाकले आहेत. या दरोड्याच्या घटनांमध्ये हल्लेखोरांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला असून एक महिला जखमी झाली आहे. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.

हे वाचलं का?

बुधवारची मध्यरात्री एक ते दीडच्या दरम्यान पाच ते सात दरोडेखोरांनी बोरामणी ते दर्गनहळ्ळी रस्त्यावरील शेतातील वस्तीवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी विरोध झाल्याने दरोडेखोरांनी बाबू हिरजे यांच्या वस्तीवर मोर्चा वळविला. घरात झोपलेल्या बाबू हिरजे यांच्यावर लोखंडी पाईपने वार करुन हल्लेखोरांनी त्यांना गंभीर जखमी केले. तसेच त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील व कानातील दागिनेही लुटून नेले.

पुण्यातील संतापजनक घटना! नराधम बापाचा १४ वर्षाच्या लेकीवर बलात्कार

या घटनेची माहिती मिळताच बुधवारी सकाळी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरोडेखोरांच्या मारहाणीत बाबू कल्लप्पा हिरजे यांचा मृत्यू झाला आहे.

रत्नागिरी : व्यापाऱ्याचं अपहरण करुन सोनं आणि रोकड लुटणाऱ्या टोळीला २४ तासांत अटक

पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथकं तयार केली असून जिल्ह्यातील विविध ठिकाणी त्यांचा शोध घेतला जात आहे.

बीड : अंबाजोगाईत पोलिसांच्या घरात घरफोडी, लाखोंचा मुद्देमाल चोरीला

    follow whatsapp