Video : अरे देवा… ऋषिकेशकडे जाणाऱ्या महामार्गावरील पूल वाहतूक सुरू असतानाच कोसळला!

मुंबई तक

• 11:07 AM • 27 Aug 2021

काही महिन्यांपूर्वी हिमकडा कोसळून हाहाकार उडालेल्या उत्तराखंडला आता पावसाने तडाखा दिला आहे. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे देहरादून-ऋषिकेश यांना जोडणारा महत्त्वाचा पूल दुर्घटनाग्रस्त झाल आहे. वाहतूक सुरू असताना पूल कोसळला. तर दुसरीकडे शंभर मीटरपर्यंत महामार्ग वाहून गेल्याची घटना समोर आली आहेे. राष्ट्रीय महामार्गावर असलेला रानीपोखरी येथील पूल देहरादून-ऋषिकेश यांना जोडणारा महत्त्वाचा पूल आहे. या महामार्गावरून पर्यायाने पूलावरून […]

Mumbaitak
follow google news

काही महिन्यांपूर्वी हिमकडा कोसळून हाहाकार उडालेल्या उत्तराखंडला आता पावसाने तडाखा दिला आहे. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे देहरादून-ऋषिकेश यांना जोडणारा महत्त्वाचा पूल दुर्घटनाग्रस्त झाल आहे. वाहतूक सुरू असताना पूल कोसळला. तर दुसरीकडे शंभर मीटरपर्यंत महामार्ग वाहून गेल्याची घटना समोर आली आहेे.

हे वाचलं का?

राष्ट्रीय महामार्गावर असलेला रानीपोखरी येथील पूल देहरादून-ऋषिकेश यांना जोडणारा महत्त्वाचा पूल आहे. या महामार्गावरून पर्यायाने पूलावरून वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, उत्तराखंडमध्ये होत असलेल्या संततधार पावसामुळे हा पूल खचला आहे.

उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस होत असल्याने नद्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी पुरामुळे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच रानीपोखरी येथे असलेला राष्ट्रीय महामार्गावरील पूल कोसळला. नदीला आलेल्या पुराचा तडाखा बसल्याने पूल कोसळला. पूला मोठा भाग पुराच्या पाण्यात कोसळला. यात काही वाहनं वाहून गेली, तर काही जखमी झाले असल्याचं वृत्त आहे. दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

दुसरीकडे मालदेवता-सहस्त्रधारा लिंक रोडची प्रचंड नुकसान झालं आहे. नदीच्या पुरामुळे जवळपास शंभर मीटर रस्ता पाण्यात वाहून गेला आहे. यात अनेक वाहनं वाहून गेली असल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे देहरादूनमध्ये हाहाकार उडालेला आहे. जनजीवन विस्कळीत झालेलं असून, रस्त्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

तिहरीमध्ये गुरूवारी रात्री मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग आणि ग्रामीण भागांना जोडणारे रस्ते बंद झाले. एनएच ५८ व एनएच ९४ या दोन महामार्गावर अनेक ठिकाणी गाळ आणि कचरा जमा झाला आहे. त्यामुळे रस्ते बंद आहेत. दुसरीकडे हवामान विभागाकडून काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    follow whatsapp