चित्रपटाची पटकथा वाटावी, असाच क्रूर प्रकार श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात घडलाय. लिव्ह-इन पार्टनर असलेल्या आरोपी आफताब पूनावालाने श्रद्धा वालकरची गळा दाबून हत्या केली. मात्र, त्यानंतर त्याने केलेलं कृत्ये समोर आल्यानंतर दिल्ली हादरली. याच प्रकरणात आणखी एक हादरवून टाकणारी माहिती समोर आलीये.
ADVERTISEMENT
आफताब पूनावालाने 18 मे रोजी त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची गळा दाबून हत्या केली. त्यानं चौकशीत दिलेल्या माहितीनुसार त्यांचे लग्न करण्यावरून वाद सुरू होते. त्या वादातून तिची हत्या केली. मात्र, हत्येचे पुरावे मिटवण्यासाठी आफताब पूनावालानं केलेलं कृत्य समोर आल्यानंतर पोलीस हादरले.
चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार आफताब पूनावालाने फ्लॅटवर श्रद्धा वालकरची हत्या केली. पुरावे नष्ट करण्यासाठी आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आफताबला तब्बल दहा तास लागले.
Shraddha Murder Case : “श्रद्धाचं फ्रीजमध्ये ठेवलेलं शीर दररोज पाहायचो” ऐकून पोलिसही हादरले
श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्यानंतर आफताब थकला होता. थोडी विश्रांती घेतल्यानंतर आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे सर्व तुकडे धुवून काढले. नंतर त्याने बिअर घेतली. सिगारेट ओढली. झोमॅटोवरून जेवण ऑर्डर केलं आणि नंतर नेटफ्लिक्सवर चित्रपट बघत बसला होता.
श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर आफताबने ते पॉलिथीन बॅगमध्ये ठेवले होते. त्यानंतर त्याने हे तुकडे मेहरोलीच्या जंगलात नेऊन फेकले. या प्रकरणाचं गूढ उलगडल्यानंतर पोलीस आता मेहरोलीच्या जंगलात मृतदेहाचे अवशेष शोधत आहेत. काही ठिकाणी पोलिसांना हाडं मिळाली असून, त्यांची डीएनए चाचणीही केली जाणार आहे.
श्रद्धाच्या हत्येनंतर इतर महिलांसोबत डेटिंग
श्रद्धाच्या हत्येनंतर आरोपी आफताबने डेटिंग सुरू केलं. आफताबने डेटिंग अप डाऊनलोड केलं. होतं. त्या माध्यमातून तो काही महिलांनाही भेटल्याचं समोर आलंय. श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवलेले असताना एका महिलेला आफताब फ्लॅटवर घेऊन आला होता.
Shraddha Walker Murder : श्रद्धाचं वडिलांसोबत शेवटचं काय बोलणं झालं होतं?
श्रद्धाच्या हत्येनंतर जून-जुलैमध्ये एक महिला आफताबसोबत घरी डेटवर आली होती, अशी माहितीही चौकशीतून समोर आलेली आहे. ही महिला मानसोपचार तज्ज्ञ होती, असंही सांगण्यात आलंय. त्यामुळे श्रद्धासोबत रिलेशनमध्ये असताना आफताबचे इतर महिलांसोबतही संबंध होते का? असा प्रश्न या प्रकरणात उपस्थित झालेला आहे. या अंगानेही पोलीस आता तपास करत आहेत.
ADVERTISEMENT