ठाकरे सरकारमध्ये नैतिकता शिल्लक आहे? अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर फडणवीसांचा प्रश्न

मुंबई तक

• 11:13 AM • 05 Apr 2021

ठाकरे सरकारमध्ये नैतिकता शिल्लक राहिली आहे का? असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर विचारला आहे. ज्या प्रकारे राज्यातील पोलिसांचा व्यवहार दिसतो आहे ते पाहूनच उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांचं प्रकरण हे सीबीआयकडे सोपवलं. या संपूर्ण प्रकरणात मी मांडलेली भूमिका कायदेशीर आणि पुराव्यांच्या आधारे मांडत होतो. मला उत्तर […]

Mumbaitak
follow google news

ठाकरे सरकारमध्ये नैतिकता शिल्लक राहिली आहे का? असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर विचारला आहे. ज्या प्रकारे राज्यातील पोलिसांचा व्यवहार दिसतो आहे ते पाहूनच उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांचं प्रकरण हे सीबीआयकडे सोपवलं. या संपूर्ण प्रकरणात मी मांडलेली भूमिका कायदेशीर आणि पुराव्यांच्या आधारे मांडत होतो. मला उत्तर देणारे माझीच चौकशी करू अशा वल्गना करत होते. मला एका गोष्टीचं समाधान आहे की मी जे पुराव्यांनिशी बोलत होतो तेच आज न्यायलायनेही म्हटलं आहे.

हे वाचलं का?

शरद पवार यांनी केलेली विनाकारण पाठराखण

शरद पवार यांच्याकडून अनिल देशमुख यांची विनाकारण पाठराखण करण्यात आली. खासकरून दुसऱ्या पत्रकार परिषदेत ते सांगत होते त्यातून हेच दिसून आलं की अनिल देशमुख यांची पाठराखण चुकीच्या पद्धतीने करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसकडे हे खातं होतं आता ते मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतील की आणखी कुणाला देतील हे पाहणंही महत्त्वाचं आहे असंही फडणवीस यांनी म्हटलंं आहे.

शरद पवार जेव्हा म्हणतात की आरोप गंभीर आहेत तेव्हा नेमकं काय होतं?

माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्यानंतर गृहमंत्र्यांनी राजीनामा देणं अपेक्षित होतं. अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे मात्र तो आधीच दिला जाईल अशी अपेक्षा होती. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. १०० कोटींच्या वसुलींचे आरोप लागल्यानंतर आणि रश्मी शुक्लांचा रिपोर्ट अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर शरद पवार हे अनिल देशमुखांचा राजीनामा घेतील असं वाटलं होतं.

Anil Deshmukh: काय-काय घडलं, कसे अडकत गेले अनिल देशमुख? पाहा सविस्तर रिपोर्ट

मात्र हायकोर्टाने जेव्हा या प्रकरणात लक्ष घातलं तेव्हा हा राजीनामा अनिल देशमुख यांनी दिला. हा राजीनामा झाला असला तरीही एका गोष्टीचं कोडं पडलं आहे की इतक्या भयावह घटना महाराष्ट्रात झाल्या. कधी नव्हे ते पोलिसांवर इतके गंभीर आरोप झाले. तरीही मुख्यमंत्री हे एक शब्द का बोलत नाहीत? त्यांचं मौन हे अस्वस्थ करणारं आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp