अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीही मिळालं नाही म्हणणाऱ्या सगळ्यांवर आज देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं. महाराष्ट्राला केंद्राच्या बजेटमध्ये प्रकल्प आणि तरतुदींच्या रूपात 3 लाख 5 हजार कोटी रुपये मिळाले आहेत. अर्थसंकल्प न वाचता काहींनी टीका केली होती त्यांना आज मी हे सांगतो आहे असं म्हणत फडणवीस यांनी टीका करणाऱ्या सगळ्यांना सुनावलं आहे. आरे कारशेडसाठी 1832 कोटी मंजूर झाल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्राला केंद्राच्या बजेटमध्ये काय मिळालं ?
मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी 1832 कोटींची तरतूद
पुणे मेट्रोसाठी 3195 कोटींची तरतूद
नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 5976 कोटींची तरतूद
राज्यातील रस्तेबांधणीसाठी एक लाख कोटींपेक्षा जास्त रूपयांची तरतूद
मुंबईला पिण्याचं पाणी मिळावं यासाठी 3 हजार कोटी रुपये
शेतकरी सन्मान निधी अंतर्गत 6 हजार 823 कोटी
बीड-परळी रेल्वेमार्गालाही पैसे देण्यात आले आहेत
मुंबईच्या लोकललाईनसाठी साडेसहा कोटी रुपये दिले आहेत
असे सगळे मुद्दे आज देवेंद्र फडणवीस यांनी समजावून सांगितले आहेत.
विधानसभा अध्यक्षपदावरून सरकार घाबरलं याचा आनंद-फडणवीस
महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध होते, निवडणूक होत नाही. पण ठाकरे सरकार असं आहे की विरोधकांना विश्वासात घेत नाही, त्यांच्या अधिकारांचं हनन करत राहतं. विधानसभा अध्यक्षपदावरून सरकार घाबरलं आहे, हे पाहून मला आनंद झाला आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
शरजीलला अजून अटक का केली नाही?
हिंदू धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शरजीलला अटक केली जात नाही मात्र त्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना मात्र अटक केली जाते. त्यामुळे हे शरजील सरकार आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT