धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर शिंदे आणि ठाकरे गटात नवं चिन्ह आणि नव्या नावासाठी विचारमंथन सुरू झालंय. तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उलट सुलट प्रतिक्रियाही येऊ लागल्यात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलंय.
ADVERTISEMENT
मुंबईत माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला यात काहीच आश्चर्य वाटत नाहीये. कारण गेल्या २०-२५ वर्षात जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे वाद आले, त्या त्या वेळी निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय देण्याआधी अंतरिम निर्णय देऊन चिन्ह आणि नाव गोठवणं आणि त्यानंतर अंतिम निर्णय देणं अशीच कार्यपद्धती स्वीकारलीये.”
“आपल्याकडे निवडणूक आल्यामुळे ते करणं गरजेचं होतं. यात काहीही आश्चर्य वाटण्यासारखं नाहीये. मला ही अपेक्षा आहे की, जेव्हा निवडणूक आयोग अंतिम निर्णय देईल त्यावेळी निश्चितपणे जी काही बाजू एकनाथ शिंदेंनी मांडली आहे. ती बाजू वरचढ ठरेल, असं मला वाटतं”, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
धनुष्यबाण चिन्ह गोठवलं! शरद पवारांचं निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मोठं विधान, म्हणाले…
शिवसेनेची नाव शरद पवारांनी सुचवली?; फडणवीसांचं उत्तर
यामागे भाजप असल्याचा आरोप होतोय. या आरोपाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “बोलायला आपण काहीही बोलू शकतो. आता कुठल्यातरी चॅनेलवर मी बातमी वाचत होतो की, शिवसेनेनं जी नावं सांगितलीत त्यामागे शरद पवार आहेत. ज्या जे वाटतं ते तो सांगतो”, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिलं.
‘बाळासाहेबांच्या प्रतिमेची तरी लाज बाळगा रे’; शिंदे गटाचा ठाकरे गटावर गंभीर आरोप
‘मोदी’ नाण्यावरून देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना उत्तर
उद्धव ठाकरेंनी ठाकरे गटाच्या प्रमुखांसोबत झालेल्या बैठकीत बोलताना मोदींवर टीका केली. नोटबंदीमुळे मोदींचं नाणं खोटं ठरलं होतं, असं ते म्हणाले. त्यावरून फडणवीसांनी उत्तर दिलंय. “बहुतेक उद्धवजी हे विसरलेत की नोटबंदी नंतरच्या सगळ्या निवडणुका मोदींच्या नाण्यावर तेही जिंकलेत. त्यांचे १८ खासदार मोदीजींचं नाणं दाखवून निवडून आलेत. त्यांचे जे ५६ आमदार निवडून आलेत, ते मोदीजींचं नाणं दाखवूनच निवडून आलेत. त्यामुळे बाळासाहेब हे नेहमी श्रद्धेय राहतील, पण देशात मोदीजींचं नाणं चालतच राहिल”, असं फडणवीस म्हणालेत.
ADVERTISEMENT