महाविकास आघाडी सरकार हे रोकशाही म्हणजे प्रत्येक गोष्ट थांबवणारं सरकार आहे. वसुली, खंडणी यांचे विविध प्रकार आणि भ्रष्टाचाराने बरबटलेलं हे सरकार आहे अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. बुधवारी होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीकेचे बाण चालवले आहेत. या सरकारने ‘रोक’शाही म्हणजे प्रत्येक गोष्ट थांबवायची आणि ‘रोख’शाही म्हणजेच वसुली करायची या पद्धतीने सरकार चालवलं आहे असाही टोला त्यांनी लगावला.
ADVERTISEMENT
आम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न या अधिवेशनात उचलून धरणार आहोत. शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. त्यांच्या वीज तोडण्या या तर सुलतानी पद्धतीने सुरू आहेत एवढंच नाही तर त्यांना आपत्ती येऊनही कोणतीही मदत दिलेली नाही. फक्त विमा कंपन्यांचं भलं करण्याचं काम या सरकारने केलं आहे असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Exclusive: ‘आजही मला त्याचा पश्चाताप होतो…’, देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?
भाजपच्या 12 आमदारांना वर्षभर निलंबन कायम ठेवण्याच्या निर्णयाविरोधात देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ संसदेचं अधिवेशन इतका काळ अधिवेशन चालू शकतं तर महाराष्ट्राचं का चालत नाही? राज्यात सर्वात कमी वेळ अधिवेशन घेतलं जात आहे. लोकशाही जेवढी कुलुप बंद करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अनेक राज्यांचे अधिवेशन फार काळ चालू शकतात. माहराष्ट्रात मानसिकताच नाही. या सरकारने लोकशाही बंद केली आहे. या सरकारमध्ये रोकशाही सुरू आहे. आणि रोखशाही म्हणजे प्रत्येक गोष्टीला थांबवणे, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.
Exclusive: आदित्य आणि उद्धव ठाकरेंचा इगो.. म्हणून मेट्रो-3 ची हत्या, फडणवीस प्रचंड संतापले!
आम्ही असं ऐकलं आहे की आवाजी मतदानाने यावेळी सभागृहाचे अध्यक्ष निवडले जाणार आहेत. या सरकारला आपल्या आमदारांवर थोडाही विश्वास नाही त्यामुळे नेहमीच्या गुप्त मतदानाची पद्धत बदलून अध्यक्ष निवडला जाणार आहे. अशात आमच्याकडे 170 आमदारांचं बळ आहे असं सांगायचं आणि दुसरीकडे पद्धत बदलून आवाजी मतदानाने अध्यक्ष निवडत आहात इथेच तुमचा तुमच्या आमदारांवरचा विश्वास दिसून येतो असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आमचे बारा आमदार निलंबित केले, टेक्निकली आमचं संख्याबळ कमी करायचं ही या सरकारची खेळी आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. आमचे आमदार खोटे आरोप लावून त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे असाही आरोप फडणवीस यांनी केला.
ओबीसी आरक्षणाच्या बाबतही या सरकारने वेळकाढूपणा केली. राज्य सरकारतर्फे सुप्रीम कोर्टात सांगण्यात आलं की तीन महिन्यात आम्ही इम्पेरिकल डेटा तयार करू. मग दोन वर्षांचा वेळ या सरकारने का काढला? असाही प्रश्न यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. या सरकारला राज्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही. दोन वर्षे झाली तरीही सरकार अस्तित्वात आहे की नाही हेच कळत नाही. आता एक ठीक आहे की मुख्यमंत्र्यांची तब्बेत बरी नाही. त्यांना उत्तम आरोग्य लाभो या सदिच्छा मी व्यक्त करतो. मात्र मागच्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात सरकारचं असित्त्वच दिसत नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT