ADVERTISEMENT
होळी हा सण संपूर्ण भारत देशात मोठ्या आनंद, उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जातो. होळीला अद्याप काही दिवस बाकी असले तरीही उत्तर प्रदेशातील नांदगावमध्ये होळीचा एक अनोखा रंगोत्सव पार पडला.
उत्तर प्रदेशातील नांदगाव येथे मंदिरात लठमार होली नावाने होळीचा सण साजरा केला जातो. या उत्सवामागे शेकडो वर्षांपासूनची राधा-कृष्णाच्या प्रेमाची महती आहे.
पुरुष आणि महिला अशा गटांमध्ये ही होळी खेळली जाते. ज्यात पुरुष हे नांदगावमधून सहभागी होतात तर महिला या बरसाना भागातल्या असतात. भगवान श्रीकृष्ण हे नांदगावचे तर राधा या बरसानाच्या असल्याचं बोललं जातं.
ज्यावेळी पुरुष मंडळी पिचकारीने या महिलांवर पाणी मारतात तेव्हा महिला काठीने त्यांना मारतात असा इथला रिवाज आहे.
महिलांच्या या लाठ्यांपासून स्वतःचा बचाव करत रंगांची उधळण करण्याचं काम पुरुषांकडे असतं.
गेली अनेक वर्ष ही परंपरा इथे चालू आहे. यात सहभागी होणारे सर्व नागरिक कृष्णभक्तीच्या रंगांमध्ये तल्लीन होऊन जातात
नांदगाव आणि बरसाना येथील लोकांचा असा विश्वास आहे की या लाठ्यांचा त्यांना त्रास होत नाही. जरीही त्रास झाला तिकडे माती लावून हे नागरिक पुन्हा रंगोत्सवात सहभागी होतात.
यावेळी भांग आणि थंडाईचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त केलेला असतो.
गेली अनेक वर्ष ही परंपरा या भागात अविरतपणे सुरु आहे.
ADVERTISEMENT