Mahabaleshwar: दवबिंदू झाले हिमकण! फिरण्याचा प्लान असेल, तर ‘इथे’ जा

इम्तियाज मुजावर

11 Jan 2023 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:50 AM)

Mahabaleshwar Winter and Snowflakes: महाबळेश्वर: महाराष्ट्राचे (Maharashtra) नंदनवन असलेल्या पर्यटनस्थळ महाबळेश्वरमध्ये (Mahabaleshwar) थंडीचा (Winter) कडाका वाढला आहे. येथील नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक (Venna lake), लिंगमळा (Lingmala) परिसरात दवबिंदूचे हिमकणात (snowflakes) रूपांतर झाल्याचे दृश्य आता पाहावयास मिळाले. पहाटे वेण्णालेक सह लिंगमळा परिसरात तापमानाचा पारा 3 ते 4 अंशापर्यंत खाली गेला आहे. (dew points became snowflakes if […]

Mumbaitak
follow google news

Mahabaleshwar Winter and Snowflakes: महाबळेश्वर: महाराष्ट्राचे (Maharashtra) नंदनवन असलेल्या पर्यटनस्थळ महाबळेश्वरमध्ये (Mahabaleshwar) थंडीचा (Winter) कडाका वाढला आहे. येथील नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक (Venna lake), लिंगमळा (Lingmala) परिसरात दवबिंदूचे हिमकणात (snowflakes) रूपांतर झाल्याचे दृश्य आता पाहावयास मिळाले. पहाटे वेण्णालेक सह लिंगमळा परिसरात तापमानाचा पारा 3 ते 4 अंशापर्यंत खाली गेला आहे. (dew points became snowflakes if you plan to go for a picnic go mahabaleshwar)

हे वाचलं का?

वेण्णालेक परिसरामध्ये आज पहाटे वाहनांवर, पानांवर, वेण्णालेक नौकाविहारासाठी ये -जा करण्यासाठी असलेल्या लोखंडी बोटीवर काही प्रमाणात हिमकण जमा झाल्याचे चित्र दिसले. तर लिंगमळा परिसरातील स्मृतिवन भागात देखील पाने, झाडेझुडपांवर हिमकण पाहावयास मिळाले. या हंगामातील ही पहिलीच घटना असून, थंडीचा कडाका असाच कायम राहिला तर वेण्णालेक परिसरामध्ये पुन्हा हिमकणाचा अनुभव पर्यटकांना मिळेल.

Satara : मिनी काश्मीर हाऊसफुल्ल, नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी भन्नाट ठिकाण

यंदा हिमकण दिसण्याची पहिलीच वेळ

महाबळेश्वर शहर व परिसरात थंडीचा जोर वाढला असून या कडाक्याच्या थंडीमुळे निसर्गाची विविध आकर्षक रूपे व सृष्टीसौंदर्य पाहावयास मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढत चालले असून वेण्णालेक परिसर, लिंगमळा परिसरामध्ये थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे.

महाबळेश्वर सोडून 20 किमी खाली गेल्यावर असणारी बोचरी थंडी व महाबळेश्वरमध्ये असणारी गुलाबी थंडी यातील फरकाची मात्र पर्यटक अनुभवत आहेत. सध्या वेण्णालेक परिसरामध्ये होणारे हिमकण पाहण्यासाठी व गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटनाची पाऊले या थंड हवेच्या निसर्गरम्य ठिकाणी वळत आहेत.

वेण्णालेक परिसरामध्ये थंडीचे प्रमाण अधिक असल्याने स्थानिकांनी शेकोटीचा आधार घेतल्याचे पाहावयास मिळत आहे. यंदा थंडीच्या हंगामातील हिमकण दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे.

‘काश्मीर’नव्हे हे तर महाबळेश्वर

महाबळेश्वर पर्यटनास आलेले पर्यटक या कडाक्याच्या थंडीमुळे काश्मीरच्या थंडीचा फील घेत आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे दिवसभर पर्यटक स्वेटर, शाल, मफलर, कानटोपी असे गरम वस्त्रे परिधान करुन गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसत आहेत, मुख्य बाजारपेठेत देखील उबदार शाल, स्वेटर मफलर, ब्लँकेट्स आदींच्या खरेदी करताना पर्यटक दिसत आहेत. हॉटेल्समध्‍ये पर्यटकांसाठी बॉनफायरची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे.

महाबळेश्वर-सातारा भागात मुसळधार पाऊस, मांडवे गावात ढगफुटी सदृष्य परिस्थिती

दवबिंदू होण्यामागील शास्त्रीय कारण

भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास शहरातील इमारती, उष्णता, झाडी या बाबी दवबिंदू गोठण्यासाठी पूरक नसतात. मात्र, वेण्णालेक परिसरातील भौगोलिक परिस्थिती वेगळी असून मोकळी जागा, शेती व लोकवस्तीचे प्रमाण कमी असल्याने दवबिंदू गोठण्यास अनुकूल परिस्थिती आहे. दवबिंदू आकाराने लहान असतात. पाण्याच्या सूक्ष्म कणावर थंडीने प्रक्रिया होऊन त्याचे रूपांतर दवबिंदूत होते. थंडीची लाट आल्यावर पाण्याच्या सभोवतालच्या अॅल्युमिनियम किंवा लोखंडाशी संपर्क आल्यावर पाण्याच्या कणांवर रासायनिक प्रक्रिया होऊन त्याचे रूपांतर दवबिंदूत होते.

    follow whatsapp