टीकटॉकस्टार पूजा चव्हाण हत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी रविवारी वर्षा बंगल्यावर आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला. १५ दिवसांपेक्षा जास्त काळ मीडियापासून दूर राहिलेल्या संजय राठोड यांना दबावामुळे अखेरीस आपलं पद सोडावंच लागलं. तब्बल सव्वा वर्षाच्या कालावधीनंतर महाविकास आघाडी सरकारमधली पहिली विकेट संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे पडली. काही दिवसांपूर्वी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही रेणू शर्मा या महिलेने अशाच पद्धतीने आरोप केले होते. मात्र कालांतराने ही तक्रार मागे घेण्यात आल्यामुळे हे प्रकरण शांत झालं. परंतू धनंजय मुंडे यांनीही आपला राजीनामा द्यायला हवा होता अशी मागण त्यांच्या बहिण आणि परळीच्या माजी आमदार पंकजा मुंडे यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
“धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा ही भाजपची मागणी होती. भाजपची भूमिका हीच माझी भूमिका. याप्रकरणी तक्रार मागे घेण्यात आली असली तरीही धनंजय यांनी स्वतःचं दायित्व ठेवून निर्णय घ्यायला हवा होता. आपल्यामुळे पक्षाला अडचण होत असेल, आणि सत्य-असत्य समोर यायचं असेल तर हा निर्णय घेणं गरजेचं होतं. या गोष्टीचं समर्थन करण्याचा कधीच प्रश्न उद्भवत नाही. हा विषय न्याय-अन्यायाचा आहे, परंतू राजकीय अस्त्रासाठी मला याचा वापर करायचा नाही. परंतू धनंजय मुंडेंना आपला राजीनामा देण्यास काहीच हरकत नव्हती.” पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे यांनी आपली बाजू मांडली.
अवश्य वाचा – Pooja Chavan प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी-पंकजा मुंडे
दरम्यान काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही रेणु शर्मा या महिलेने आरोप केले होते. या आरोपांमुळेही महाराष्ट्राच्या राजकारणात गदारोळ माजला होता. संजय राठोडांवर कारवाई केल्यानंतर सरकार धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घेणार का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ठाकरे यांनी, “धनंजय मुंडे प्रकरणात तक्रारदार महिलेने स्वतःहून आपली तक्रार मागे घेतली आहे. इथे संजय राठोड नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देत आहेत. विरोधकांना तरीही तपासावर विश्वास नाहीये आणि ते अधिवेशन चालू देणार नाही असं म्हणतायत.”
अवश्य वाचा – या ४ कारणांमुळे शिवसेनेला घ्यावा लागला संजय राठोडांचा राजीनामा
ADVERTISEMENT