हिरेन प्रकरणाशी माझा दुरुनही संबंध नाही – धनंजय गावडे

मुंबई तक

• 08:31 AM • 09 Mar 2021

मनसुख हिरेन हत्याप्रकरणी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात सनसनाटी आरोप करत मुंबई पोलीस दलातले अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली. हिरेन यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबाबातील महत्वाचे २-३ मुद्दे वाचून दाखवत फडणवीसांनी वाझे यांनीच हिरेन यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला. सभागृहात बोलत असताना फडणवीस यांनी हिरेन यांचं शेवटचं लोकेशन ज्या […]

Mumbaitak
follow google news

मनसुख हिरेन हत्याप्रकरणी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात सनसनाटी आरोप करत मुंबई पोलीस दलातले अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी केली. हिरेन यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबाबातील महत्वाचे २-३ मुद्दे वाचून दाखवत फडणवीसांनी वाझे यांनीच हिरेन यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला. सभागृहात बोलत असताना फडणवीस यांनी हिरेन यांचं शेवटचं लोकेशन ज्या ठिकाणी सापडलं त्या धनंजय गावडे या इसमाचा उल्लेख केला. धनंजय गावडे हे शिवसेनेचे नगरसेवक आहेत.

हे वाचलं का?

दरम्यान मनसुख हिरेन प्रकरणात आपलं नाव आल्यानंतर गावडे यांनी ‘मुंबई तक’शी बोलत असताना आपली प्रतिक्रीया दिली. “मनसुख हिरेन प्रकरणात माझा दुरुनही संबंध नाही. इतक्या मोठ्या नेत्यांनी असे आरोप लावावेत याबद्दल मला खरंच वाईट वाटतंय. NIA, ATS सारख्या तपासयंत्रणा याचा तपास करतायत आणि जे सत्य आहे ते यामधून बाहेर येईलच. एका संशयित मृतदेहाचं शेवटचं लोकेशन वसईत सापडतं आणि म्हणून त्याला माझं नाव देणं म्हणजे कोणत्यातरी बिल्डर लॉबीला पाठीशी घालण्याचं काम आहे.”

मनसुख हिरेन मृत्यू: सचिन वाझेंना तात्काळ अटक करा – देवेंद्र फडणवीस

यावेळी बोलत असताना धनंजय गावडे यांनी आपल्यावरील दाखल असलेल्या गुन्ह्याबद्दलही माहिती दिली. “मला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे. आतापर्यंत माझ्याविरोधात कोणताही खटला चाललेला नाही आणि मला न्यायालयाने दोषी ठरवलेलं नाही. त्यामुळे कोणत्याही पुराव्याशिवाय माझ्यावर आरोप करु नयेत अशी माझी विनंती आहे. एखाद्या बिल्डरला वाचवण्यासाठी इतक्या मोठ्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावायला नको”, असंही गावडे म्हणाले. २०१७ सालच्या गुन्ह्यात माझा सहभाग नसल्याचा अहवाल तपास अधिकाऱ्यांनी सत्र न्यायालयात दिला आहे. त्यामुळे वडाचं साल पिंपळाला लावण्याची काम थांबवावीत अशी विनंती गावडे यांनी केली.

“मोहन डेलकरांच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्यांनाही अटक करा”

    follow whatsapp