Punjab 95 postponed: 'दिल-लुमिनाटी' या आपल्या भारत भरात गाजवलेल्या खास म्युझिक कॉन्सर्टमुळे दिलजीत दोसांझ सध्या चर्चेत आहे. या कॉन्सर्टनंतर त्यानं आता चित्रपटांकडे लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केलीय. यादरम्यानच सध्या त्याच्यासमोर एक अडचण निर्माण झाली असून, त्याचा नवीन चित्रपट 'पंजाब 95' हा चित्रपट 7 फेब्रुवारीला रिलीझ होऊ शकणार नाहीये. काही कारणांमुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
'पंजाब 95' हा चित्रपट पंजाबी मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंग खलरा यांचा बायोपिक आहे. या भूमिकेसाठी दिलजीतनेही खूप मेहनत घेतली होती. या चित्रपटाची एक झलक त्यानं त्याच्या सोशल मीडियावर दाखवली होती. पण आता त्याचे चाहते हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहू शकणार नाहीयेत. दिलजीतनं त्याच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाशी संबंधित एक मोठी अपडेट शेअर केली आहे. हे कळवताना अत्यंत दु:ख होतंय, की आम्ही आमचा पंजाब 95 हा चित्रपट 7 फेब्रूवारीला प्रदर्शित करणार नाही आहोत.
हे ही वाचा >> प्रताप सरनाईकांचा बंगला भाजपच्या राज्यमंत्र्याना! सरकारी बंगला काढला की बदलून दिला? महायुतीत चाललंय तरी काय?
काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला होता.टीझरमध्ये चित्रपटाची रिलीज होण्याची तारीखही जाहीर करण्यात आली होती. या टीझरमध्ये पंजाबमधील संघर्ष आणि रक्तपात दाखवण्यात आला. पंजाब पोलिसांकडून होत असलेल्या कारवाया या चित्रपटात दिसत आहेत. जसवंत सिंग खलरा म्हणजेच दिलजीत हे सगळं उघड करताना दिसत आहेत.
हे ही वाचा >> Walmik Karad CCTV Video : खंडणी मागितली त्यादिवशी सगळे आरोपी एकत्र? CCTV ने उडवली खळबळ
दरम्यान, आता चित्रपटाशी संबंधित वादांमुळे त्याची रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटात दिलजीत दोसांझ व्यतिरिक्त अर्जुन रामपालही दिसणार आहे. रॉनी स्क्रूवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
ADVERTISEMENT
