Maharashtra Rape Case महाराष्ट्रातल्या जालना जिल्ह्यातला एका गावात दिव्यांग महिलेवर सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी शनिवारी या प्रकरणाची माहिती दिली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात पोलीस आणखी दोन आरोपी शोधत आहेत. २८ ऑगस्टला बदनापूर तालुक्यातल्या गावात ही घटना घडली.
ADVERTISEMENT
नेमकी काय घडली बलात्काराची घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिव्यांग पीडितेच्या कुटुंबाला या घटनेबाबत कळलं. त्यांनी लगेचच पोलिसांकडे संपर्क केला. त्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलेल्या माहितीनुसार या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे.
नागपुरातील संतापजनक घटना! पोलीस उपनिरीक्षकाचा अल्पवयीन मुलींवर बलात्कार
३१ ऑगस्टला उस्माबादमध्ये ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर मध्ये एका सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. तुळजापूरच्या सिंदफळ गावात ही धक्कादायक घटना घडली. गावकऱ्यांनी एका आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सिंदफळ गावात ही लहान मुलगी घराच्या मागे खेळायला गेली होती. माळुब्रा येथील ४० वर्षीय संतोष वडणे या नराधमाने या मुलीला शेतात नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. एवढंच नाही तर तिच्या गुप्तागांवर ब्लेडने वार केले. या मुलीला तुळजापूरच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
भिवंडीत १६ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार
भिवंडीतल्या १६ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. भिवंडीतल्या काल्हेर गावात ही घटना घडली. १६ वर्षांची ही मुलगी सोशल मीडियाच्या माध्यमातून एका मुलाशी भेट झाली. दीड वर्षापूर्वी तरूणाने इंस्टाग्रामवर चॅटद्वारे पीडितेशी बोलण्यास सुरूवात केली. दोघांनी ३० ऑगस्टच्या आधीच्या शुक्रवारी भेटण्याचा बेत आखला होता. हा तरूण तिला तिच्या मित्राच्या फ्लॅटवर घेऊन गेला. त्यानंतर दोन मुलं तिथे आली. या तिघांनी दोरीने बांधून या मुलीला बेडरूममध्ये नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला.
ऑगस्ट महिन्यात घडलेल्या या दोन घटना ताज्या असतानाच जालन्यातल्या दिव्यांग मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलीस आता दोन फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
ADVERTISEMENT