Jalna Firing : कारमधून आलेल्या चौघांनी गोळीबार केला, पळून जाताना ट्रक चालकाच्या कमरेला... जालन्यात थरारक घटना

मुंबई तक

11 Dec 2024 (अपडेटेड: 11 Dec 2024, 09:19 AM)

जालना शहरातील संभाजीनगर रोडवरील टोल नाक्याजवळ ट्रकचालकावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. 24 वर्षीय ट्रक चालक गोळीबाराच्या घटनेतून अगदी थोडक्यात बचावला आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

गोळीबाराच्या घटनेनं जालना शहर हादरलं

point

टोल नाक्यावरील थरार सीसीटीव्हीमध्ये कैद

point

ट्रक चालकावर गोळीबार कुणी केला?

Jalna Crime News : जालना शहरात असलेल्या एका टोलनाजवळ झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं शहर हादरलं आहे. कारमधून आलेल्या काही लोकांनी एका ट्रक चालकावर हल्ला करत त्याच्यावर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. ट्रकमध्ये भंगार घेऊन मुंबईकडे निघालेल्या या ट्रक चालकाला काही जणांच्या टोळक्यानं अडवून गोळीबार केल्याचा व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे. 

हे वाचलं का?

जालना शहरातील संभाजीनगर रोडवरील टोल नाक्याजवळ ट्रकचालकावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. 24 वर्षीय ट्रक चालक गोळीबाराच्या घटनेतून अगदी थोडक्यात बचावला आहे. बंदुकीची गोळी कमरेला लागली. मात्र, ट्रक चालकाचा जीव या घटनेत अगदी थोडक्यात वाचला आहे.

हे ही वाचा >>Manoj Jarange Beed : "तुमच्या आज्याची, बापांची चालत होती, पण आता...", सरपंचाच्या हत्येनंतर जरांगेंचा कुणाला इशारा?

मोहम्मद रिझवान हसाबुद्दीन असं गोळीबारात जखमी झालेल्या ट्रक चालकाचं नाव आहे. मोहम्मद रिझवान हसबुद्दीन हा ट्रकमध्ये भंगार माल घेऊन मुंबईहून जालन्याकडे निघाला होता. त्याचवेळी जालना शहरातील जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील टोला नाक्याजवळ कारमधून आलेल्या तिघांनी ट्रकचालक मोहम्मद रिझवान हसबुद्दीनवर हल्ला केला. जखमी ट्रकचालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तसंच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये काय दिसलं? 

हे ही वाचा >>Kurla Accident: चालक संजय मोरेने 'हत्यारा'सारखा केला बसचा वापर?, पोलिसांचा खळबळजनक दावा...

रस्त्याच्या बाजूला ट्रक उभा असताना समोरच लाववेल्या कारमधील काही लोक ट्रक चालकाला मारताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हल्ला करणाऱ्या ौघांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न ट्रक चालक करतो. तो पळत असतानाच हल्लेखोर कारमध्ये जातात आणि जाताना ट्रक चालकाच्या दिशेनं गोळीबार करतात. 

दरम्यान, या सर्व घटनेमागे काय कारण होतं ते आणखी स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र पुन्हा एकदा जालना शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दलचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

    follow whatsapp